BREAKING NEWS
latest

हवामान विभागातर्फे महाराष्ट्रावर वादळी संकट व गारपीटचा इशारा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नाशिक : नाशिक जिल्ह्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये  नुकसान झालेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 'ऑरेंज' तर काही ठिकाणी 'येलो' अलर्ट जारी करण्यात आलेला आहेत. वादळी वारे  प्रमाणात वाहणार आहेत. वादळाचे संकट  नाशिक जिल्ह्यावरती आहे. आज हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे. अर्ध्या महाराष्ट्रासाठी अर्लट देण्यात आला असून दोन-तीन दिवस सलग महाराष्ट्र मध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

पूर्व मौसमी सरी कोसळत आहे. तापमानात चढउतार होत आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध भागात शनिवारी मेघगर्जनेसह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने राज्यात वादळी पावसाचा इशारा दिला असून, ढग कायम राहण्याची शक्यता असून राज्याच्या इतर भागात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे.

राज्यात मान्सूनपूर्व ढग जमा झाले आहेत
शुक्रवारी सकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, संभाजीनगर, नांदेड, धुळे आणि पुणे जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस झाला. राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यात ४३.२ अंश सेल्सिअस, तर मालेगाव, सोलापूर, धुळे येथे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हवामान खात्याने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, बीड, लातूर, धुळे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस ११, १२ आणि १३ मे रोजी पावसाचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. नागपुरात पुढील ४ ते ५ दिवस जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्याच्या काही भागात गारपिटीचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत