BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील नवापाडा येथे जनार्दन म्हात्रे यांच्या १,०१,११,१११ रुपये देणगीतून साकारले श्री रागाई माता मंदिर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा येथे कल्याण-डोंबिवली स्थायी समिती सभापती नगरसेवक जनार्दन परशुराम म्हात्रे यांच्या १,०१,११,१११ (एक करोड एक लाख अकरा हजार एकशे अकरा) रुपयांच्या देणगीतून 'श्री रागाई माता मंदिर' उभारण्यात आले असून देवीच्या गाभाऱ्यातील सुबक नक्षीकाम चांदीचे केले आहे. त्याचा सर्व खर्च जनार्धन म्हात्रे यांच्या देणगीतून करण्यात आला आहे. डोंबिवलीत आगरी कोळी समाजाचे बहुतांश धनधांडगे राहत असून अशा सढळ हाताने देणगी स्वरूपाने आजवर इतकी मोठी रक्कम मंदिरासाठी दिली गेली नसल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.