BREAKING NEWS
latest

निवडणूक प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये १५ मे रोजी जाहीर सभा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण शहरात १० मे ऐवजी १५ मे रोजी भव्य जाहीर सभा होणार आहे. भिवंडी व कल्याण लोकसभा क्षेत्रासाठी होणाऱ्या या सभेला दोन्ही लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे रिंगणातील उमेदवार उपस्थित राहणार असून सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महायुतीचे भिवंडीतील उमेदवार व पंचायत राज केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण येथे १० मे रोजी सभा होणार होती. मात्र, या सभेच्या तारखेत बदल करण्यात आला असून त्यानुसार कल्याण पश्चिम येथील वर्टेक्स कॉम्प्लेक्स शेजारील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भव्य व विक्रमी सभा होईल. या सभेला लाखो नागरिकांची उपस्थिती राहील, अशी माहिती श्री. कपिल पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत