BREAKING NEWS
latest

महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी प्रत्यक्ष केली कल्याण मधील मतदार संघातील मतदान केंद्रांची पाहणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१९: उद्या दि. २० मे २०२४ रोजी होत असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आज कल्याण मधील जाईबाई शाळा, मॉडर्न कॉलेज, राजभर स्कुल व परिसरातील इतर मतदान केंद्रांतील व्यवस्थेबाबत पाहणी केली.