BREAKING NEWS
latest

'युट्युबर' हे आता पत्रकार नसल्याचा निवडणूक आयुक्तांचा निर्वाळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी: भिवंडी लोकसभेसह जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्हा निवडणूक आयुक्तांनी मान्यता दिलेल्या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान मोजणी करण्यासाठी ओळखपत्रे दिली जातात. बातम्या कव्हरेज करण्यासाठी यावेळीही याच प्रक्रिये अंतर्गत पत्रकारांनी ओळखपत्र मिळण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात अर्ज केले होते. ज्यामध्ये अनेक स्वयंघोषित 'यूट्यूब' पत्रकारांनीही आपला प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी अर्ज सादर केले होते. अशा लोकांचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आले असून, मान्यताप्राप्त वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांची यादी उघड करून त्यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत. ओळख मिळवण्यासाठी स्वयंघोषित 'यूट्यूब' पत्रकारांमध्ये खळबळ उडाली आहे.

भिवंडी शहरात स्वयंघोषित पत्रकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे विशेष. ज्यांना अक्षरे माहीत नाहीत. आज ते नामवंत पत्रकारांमध्येही आहेत. असे लोक स्वतःच्या स्वाक्षरीने ओळखपत्र लटकवून दिवसभर पत्रकार असल्याचा दावा करत फिरत असतात. पोलीस प्रशासन या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांची करमणूक करत आहे. बनावट ओळखपत्र बनवणाऱ्या किंवा त्यांच्या वाहनांवर 'प्रेस/पत्रकार' लिहून लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस कारवाई कधी करणार?, असा प्रश्न लोकांना पडला आहे.

निवडणुकीच्या काळात अचानक 'यूट्यूब' साईटवर अनेक न्यूज चॅनल सुरु झाले. स्वयंघोषित पत्रकार झाल्यानंतर ते पत्रकार परिषद, सरकारी-निमसरकारी कार्यक्रमांमध्ये पुढच्या रांगेत बसू लागले. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, काही यूट्यूबर्सनी त्यांच्या बनावट न्यूज चॅनेलच्या नावावर उ‌द्योग आधार कार्ड बनवले आहे. याच जोरावर युट्युब साईटवर न्यूज चॅनल उघडून ते पत्रकार झाले आहे. स्वयंघोषित पत्रकारांची संघटना तयार करून सर्वच कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवत आहेत आणि काही ठिकाणी अवैधरित्या - पैसेही वसूल करतात असे बोलले जात आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत