डोंबिवली: नुकत्याचं झालेल्या डोंबिवलीतील सोनारपाडा येथे असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत गुरुवार २३ तारखेला झालेल्या रिऍक्टरचा स्फोट होऊन ११ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५५ जण जखमी अवस्थेत इस्पितळात दाखल आहेत. या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घेत पाहणी केली होती. या दुर्घटनेसंदर्भात अमुदान केमिकल कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
स्फोटातील कंपनी मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसी हद्दीत 'मे. अमुदान केमीकल्स प्रा.लि.' या कंपनी मध्ये दि. २३/०५/२०२४ रोजी १३:४० वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने त्यात आतापर्यंत १३ व्यक्ती मयत झाल्या असुन अजुन सुमारे ५५ लोक जखमी झाले आहेत.
सदर घटनेवरुन मानपाडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७१४/२०२४ भा.दं.वि ३०४, ३२४, ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी मलया प्रदीप मेहता (वय: ३८ वर्षे) यास गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपी मलया मेहता याची आई मालती मेहता यांना गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडुन नाशिक येथुन ताब्यात घेण्यात आले असुन त्यांची चौकशी करुन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस स्टेशन यांचेकडुन गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त,(गुन्हे) पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उप आयुक्त,(गुन्हे) पराग मणेरे व शिवराज पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस आयुक्त, शोध-१ निलेश सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, स्पेशल टास्क फोर्स शेखर बागडे, पोलीस निरीक्षक श्रीमती वनिता पाटील, सपोनि. सुनील तारमाळे, श्रीकृष्ण गोरे, पोउपनि. राठोड, पोहवा ठाकुर, भोसले, पोना. हिवरे, पोकाँ. तानाजी पाटील यांनी यशस्वीरीत्या कामगिरी पार पाडली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा