BREAKING NEWS
latest

महापालिकेच्या बेजबाबदार कंत्राटदारामुळे परिसरातील नागरीकांचा जीव मुठीत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.२५ : कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे पावसाळ्या अगोदर नालेसफाई करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती. शुक्रवारी संध्याकाळी आजदेगाव येथील कावेरी चौक या ठिकाणी नाल्यातून गाळ काढण्यात आला असून काढलेला गाळ संध्याकाळी ते रात्रीच्या सुमारास रस्त्यावर पसरला असल्याने लोकांना चालतांना तारेवरची कसरत करावी लागत होती कारण काही नागरिक घसरून पडले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भात महानगरपालिकेच्या  आयुक्त इंदूरणी जाखड यांना  कळविल्यानंतर त्यांनी संबंधित कंत्राटीदारावर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले. कावेरी चौकामध्ये पडलेले गाळ आयुक्तांनी त्वरित साफ करण्याचे आदेश दिले. त्या परिसरात महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडुन साफसफाई व‌ सुशोभीकरण करण्यात आले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत