मुंबई दि.२४: राज्यात दि. ४ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार असून देशात या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. निकालाच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघात मतदानच्या दिवशी दारुबंदीचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाविरोधात 'आहार' संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायालयात आज या याचिकेवर सुनावणी होऊन मुंबईतील दारू विक्री खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तळीरामांसाठी ही खुशखबर ठरणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होत असून त्यादिवशीही दारु दुकाने, वाईन शॉप, बार व पब बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत. याप्रकरणी, दुकानमालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर न्यायालयाने दुकानदारांच्या बाजुने निर्णय दिला आहे.
लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होताच मुंबईतील दारू विक्री खुली करण्यास मुंबईत उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. 'आहार' संघटनेच्या याचिकेवर हायकोर्टाचे आज निर्णय देताना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या अगोदर मतमोजणीच्या दिवशी पूर्ण दिवस ‘ड्राय डे’ म्हणून जाहीर करण्यात आला होता. मात्र, या याचिकेच्या माध्यमातून बारमालक व दारुविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला विरोध केला. त्याच अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने २२ मे रोजी ही याचिका दाखल करुन घेतली. त्यावर, आज न्यायालयात अंतिम सुनावणी झाली असून ४ जून च्या निकाला दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा