BREAKING NEWS
latest

पंजाबमधील शेतकऱ्यांच्या रेल रोको आंदोलनाने ४६ रेल्वे रद्द..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पटियाला, दि. ४ : पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. पंजबामधील पटियाला येथील शंभू सीमेजवळ शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या रेल रोको आंदोलनामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता रेल्वेने ४६ गाड्या तीन दिवसांसाठी रद्द केल्या आहेत. तर १०० गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. फिरोजपूर विभागाचे डीआरएम सांज साहू यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, या संपामुळे रेल्वे वाहतुकीवर वाईट परिणाम होत असून तिकीट रिफंड मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

डीआरएम सांज साहू यांच्या म्हणण्यानुसार, याआधी २९  एप्रिल रोजी रेल्वेने अंबाला-लुधियाना मार्गावर धावणाऱ्या ४६ गाड्या तीन दिवसांसाठी रद्द केल्या होत्या. आता पुन्हा या ४६ गाड्या ५ मेपर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय १०० लांब पल्ल्याच्या गाड्या लुधियानाहून चंदीगड मार्गे आणि धुरी-जाखल मार्गे चालवल्या जातील. काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. बारमेर ते जम्मू तावी जाणारी ट्रेन क्रमांक १४६६१ जुनी दिल्ली-बाडमेर चक या मार्गावर धावेल. ट्रेन क्रमांक १५२११ दरभंगा ते अमृतसर अंबाला कँटला जाणार.

रद्द झालेल्या गाड्या
* जुनी दिल्लीहून कटराला ट्रेन क्रमांक १४०३३, १४०३४.
दिल्ली ते सराय रोहिला, मुंबई सेंट्रल ट्रेन क्रमांक २२४०१, २२४०२.
नवी दिल्ली अमृतसर दरम्यान ट्रेन क्रमांक १२४९७, १२४९८.
* जुनी दिल्ली ते पठाणकोट ट्रेन क्रमांक २२४२९, २२४३०.
* नवी दिल्ली ते अमृतसर दरम्यान धावणारी ट्रेन क्रमांक १२४५९, १२४६०.
* हरिद्वार-अमृतसर ट्रेन क्रमांक १२०५३, १२०५४.
* नवी दिल्ली ते जालंधर सिटी ट्रेन क्रमांक १४६८१, १४६८२.
* हिसार-अमृतसर ट्रेन क्रमांक १४६५३, १४६५४.
* चंदीगड आणि फिरोजपूर ट्रेन क्रमांक १४६२९, १४६३०.
* चंडीगड-अमृतसर ट्रेन क्रमांक १२४११, १२४१२.
* नांगल ते अमृतसर ट्रेन क्रमांक १४५०५, १४५०६.
* चंदीगड ते अमृतसर ट्रेन क्रमांक १२२४१, १२२४२.
* अंबाला ते लुधियाना ट्रेन क्रमांक ०४५०३, ०४५०४.
* जाखल ते लुधियाना ट्रेन क्रमांक ०४५०९, ०४५१०.
* लुधियाना ते भिवानी ट्रेन क्रमांक ०४५७४
* हिसार ते लुधियाना ट्रेन क्रमांक ०४५७५, ०४५७६. 
* अंबाला ते लुधियाना ट्रेन क्रमांक ०४५७९.
* लुधियाना ते अंबाला ट्रेन क्रमांक ०४५८२.
* अंबाला ते जालंधर सिटी ट्रेन क्रमांक ०४६८९, ०४६९०.
* हिसार ते लुधियाना ट्रेन क्रमांक ०४७४३, ०४७४४.
* लुधियाना ते चुरू ट्रेन क्रमांक ०४७४५, ०४७४६.
* सिरसा ते लुधियाना ट्रेन क्रमांक ०४५७३ (३ मे ते ५ मे पर्यंत रद्द)
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत