BREAKING NEWS
latest

समुद्र चौपटीवरील बंदोबस्ताकरिता ठेवलेल्या सुरक्षा रक्षकांच्या गैरसोयी दुर करण्याची कामगार सेनेची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत    

मुंबई : मुंबईतील चौपटी बंदोबस्तासाठी पालिकेच्या सुरक्षा दलातील जवानांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुरक्षा जवानांना “शहर आपत्ती प्रतिसाद पथक प्रशिक्षण”(सीडीआरएफ ट्रेनिंग) देऊन सज्ज करण्यात आले आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा चौपाटी, आक्सा चौपाटी व गोराई चौपाटी या ठिकाणी ‘लाईफ गार्ड’ सोबत कर्तव्य बजावण्यासाठी तीन्ही पाळीत सुरक्षा जवानांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत.   
तथापि, सदर सुरक्षा जवांनांना कोणत्याच मुलभूत सोयी पुरविण्यात आलेल्या नाहीत. कपडे बदलण्यासाठी योग्य चौकी, पिण्याचे पाणी, शौचालय ई. कोणत्याच सोयी उपलब्ध करुन न देता त्यांच्याकडुन, कर्तव्य बजावुन घेतले जाते. त्यामुळे वरील सोयी तात्काळ पुरवाव्यात अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका उपायुक्त किशोर गांधी यांच्याकडे केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत