BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित 'जन गण मन' शाळेचा १७ वा स्थापना दिवस जल्लोषात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : विद्येची देवता सरस्वती, बुध्दीचा दाता गजानन आणि यांचा अंश असलेले सर्वच आपण विद्यार्थी. भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी स्थापन केलेली शाळा म्हणजेच 'जन गण मन' शाळा. दिनांक २३ जून २००८ रोजी 'जे एम एफ' संस्थे अंतर्गत 'जन गण मन' शाळेची स्थापना डोंबिवली पश्चिम येथे झाली. याच शाळेचा आलेख उंचावत असतानाच 'जन गण मन' विद्यामंदिर, 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालयाची देखील स्थापना नंतर झाली.
     
'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थेच्या सचिव माननीय डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार व दिग्दर्शिका जान्हवी कोल्हे आणि इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती. सरस्वती पूजन व सत्कार समारंभ करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. इयत्ता दहावी मधील निषाद रानडे ह्या विद्यार्थ्याने स्वागतपर भाषण केले. त्यानंतर २००८ सालापासून संस्थेत कार्यरत असलेले सहकारी यांचाही गुलाबाचे फुल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पदाधिकारी व्यक्तींनी शाळेबद्दल भरभरून बोलून आपल्या शाळेविषयीच्या कौतुकाने भावना व्यक्त केल्या.
       
'जे एम एफ' हे तीन अक्षर दिसताना,वाचताना छोटी वाटतात परंतु 'जान्हवीज मल्टी फाउंडेशन' उभे करताना खडतर तपश्चर्या करावी लागली आहे असे डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगून हे सोनेरी दिवस पाहण्यासाठी तप्त आगीत तापून निघावे लागले असेही सांगितले.

मी निमित्त मात्र आहे परंतु ह्या शाळेचे खरे वारसदार तुम्ही आहात असे विद्यार्थ्यांना सांगून संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी संस्था स्थापनेचा सर्व प्रवास सांगितला. स्वतः शाळेत न जाता अथक परिश्रमाने अभ्यास करून ध्येय पूर्ण केले, तसे तुम्ही 'जन गण मन' शाळेत येऊन आपले ध्येय आणि स्वप्न पूर्ण करा, त्यासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही देखील दिली.
      
दिग्दर्शिका व खजिनदार जान्हवी कोल्हे यांच्या नावाने ही 'जान्हवी मल्टी फाउंडेशन' संस्था स्थापित आहे, त्याबद्दल त्यांनीही लहानपणापासून त्यांच्या आई वडिलांचा बघितलेला खडतर प्रवासाला त्यांच्या कर्तुत्वाला सलाम केला. जरी ही संस्था, शाळा माझ्या नावाने असली तरी ती माझी एकटीची नसून तुम्हा सर्वांची आहे कारण 'जे एम एफ' ही केवळ संस्था नसून एक कुटुंब आहे व त्या कुटुंबाचाच तुम्ही सुद्धा एक भाग आहात, असे भावनिक उद्गारामधून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
    
इयत्ता सहावी मधील विद्यार्थ्यांनी मोबाईल टिक टॉक रिल्स ह्याबाबत एक सामाजिक संदेश देऊन नाटक सादर केले. तर शाळेतील सर्व मुलांनी खाद्यजत्रा, तसेच किरकोळ मूल्य ठेवून विक्रीसाठी काही उपयोगी वस्तू देखील ठेवल्या होत्या. सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी देखील या जत्रेचा आनंद घेतला. दुपारच्या सत्रात 'जन गण मन' विद्यामंदिर शाळेने देखील शाळा स्थापनेच्या वाढदिवसादिनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वतः रचलेले 'जन गण मन है स्कूल हमारा, है सबसे प्यारा प्यारा..नाज करेगा एक दीन देखो हम पे भारत वर्ष हमारा..'  हे गाणे सकाळी व दुपारी प्रार्थना सत्रात गाऊन सर्व मुलांनी शाळेला मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी मधील पार्थ रेडिज व स्पर्श ह्या विद्यार्थ्यांनी केले व इयत्ता तिसरी मधील रुही मोरे ह्या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत