डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील विष्णुनगर पोलीस ठाणे येथे तक्रारदार दीपा दिगंबर गोरे (वय: ४५ वर्षे) यांच्याकडून दिनांक १४/०६/२०२४ रोजी माहिती प्राप्त झाली की, त्यांची वृद्ध आई आशा अरविंद रायकर (वय: ६५ वर्षे) राहणार: रुम नं १०६, वसंत निवास बिल्डींग, शास्त्रीनगर हॉस्पीटल च्या मागे, गोल्डन नेक्स कॉप च्या बाजुला कोपर क्रॉस रोड, डोंबिवली (प) येथे त्यांच्या राहत्या घरी खुन झाला आहे. त्याबाबत विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर. ६११/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२,४५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ठिकाणी घटनास्थळी बिल्डींग मध्ये सीसीटिव्ही फुटेज नसल्याने आजुबाजुचे लोकांकडे तपास करुन माहिती घेता सदर वृद्ध महिलेचा खुन हा दि. १३/०६/२०२४ रोजी दुपारी १४.०० ते १८.०० चे दरम्यान झाला असुन आरोपी याने त्या वृद्ध महिलेचा खुन करुन तिच्या गळ्यातील सोन्याची माळ व कानातील कर्णफुलं चोरी करुन घराचा दरवाजाची कड़ी बाहेरुन लावुन पसार झाला अशी माहीती प्राप्त झाली. तरी आरोपी याचा कोणताही धागा दोरा नसताना तपास करुन सदर बिल्डींग मध्ये राहणारा इसम यश सतीश विचारे, (वय: २८ वर्षे), व्यवसाय: बेकार, राहणार: रुम नं ३०७, ३०८, वसंत निवास बिल्डींग, शास्त्रीनगर हॉस्पीटल च्या मागे गोल्डन नेक्स कॉप च्या बाजुला कोपर क्रॉस रोड, डोबिवली (प) यास ताब्यात घेवुन आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्यास मोबाईल मध्ये बेटिंग लोटस ३६५ या साईट वर क्रिकेटचा ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद असल्याने व त्यावर ६०,०००/- रुपयांचे कर्ज झाल्याने सदरचे कर्ज भरण्यासाठी आरोपी याने त्याचे बिल्डींगमध्ये राहणारी वृद्ध महिला आशा अरविंद रायकर (६५) हिचे सोने काढुन घेण्याचा प्लॅन करून दि. १३/०६/२०२४ रोजी दुपारी १५:३५ वाजण्याच्या दरम्यान वृद्ध महिलेचा खुन करुन तिच्या गळ्यातील सोन्याची माळ व कानातील कर्णफुलं चोरी करुन घराचे दरवाजाची बाहेरुन कडी लावुन गेला असल्याबाबत निष्पन्न झाले.
सदर वृद्ध महिलेच्या खुनाची माहिती विष्णूनगर पोलीस ठाणे येथे प्राप्त झाल्यानंतर आरोपी याचा कोणताही धागा दोरा नसताना तपास करुन अवघ्या ०६ तासाच्या आत आरोपीस पकडुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे. सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण सचिन गुंजाळ व मा. सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, सुनिल कुराडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, पोनिरी (गुन्हे) गहिनीनाथ गमे, सपोनि सचिन लोखंडे, पोउपनिरी. दिपविजय भवर, देशमुख, पोहवा. जमादार, पाटणकर, भोसले, पोना. भोई, पोहवा. गवळी, नागपुरे, मोरे, पाटील, पोशि. साबळे, रायसिंग यांनी सदरची कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा