BREAKING NEWS
latest

मनसे चे दानशूर व्यक्तिमत्त्व प्रल्हाद म्हात्रे यांनी शिक्षणासाठी मुलांना केली ९०,८८८ रुपयांची आर्थिक मदत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : अनेक विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. डोंबिवलीतील अशाच दोन मुलांचे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबले होते. मात्र, मनसेचे डोंबिवली विधानसभा संघटक तसेच दानशूर व्यक्तिमत्त्व प्रल्हाद म्हात्रे यांनी त्या दोन मुलांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणले.

डोंबिवलीतील मोठागाव वेताळ नगर येथे रूपेश सहदेव शिंदे हे पत्नी रिया आणि यांच्या रिषम (१५ वर्षे) आणि अन्वी (१० वर्षे) या दोन मुलांसह राहतात. रिषम २०१९-२० मध्ये सातवी पास झाला. पण शाळेची फी बाकी असल्याने शाळेने निकाल देण्यास
नकार दिला. कोरोना काळात रूपेश शिंदे यांची नोकरी गेली. मुलगा आठवीसाठी जेव्हा शाळेत गेला तेव्हा शाळेने त्याची फी भरली नसल्याचे कारण देत निकाल दिला नाही व आठवीत प्रवेशही दिला नाही. त्याची दोन वर्षे वाया गेली. असाच प्रकार अन्वीच्या बाबतीतही घडला, असे पालकांचे म्हणणे आहे. मात्र शाळेने हा आरोप फेटाळून लावला आहे.

या मुलांचे पालक रूपेश आणि रिया शिंदे यांनी अखेर मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडे धाव घेतली. या दोन्ही मुलांची थकीत शालेय फी ९० हजार ८८८ रुपये भरण्याचा निर्णय प्रल्हाद म्हात्रे यांनी घेतला जेणेकरून मुले  आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत