BREAKING NEWS
latest

लोन रिकव्हरी करिता बनावट सिमकार्ड वापरून ग्राहकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या टेली कॉलिंग सेंटरचा खंडणी विरोधी पथकाकडून पर्दाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे दि. ०९: मोबाईल ऍप द्वारे लोन घेतलेल्या इसमाच्या नातेवाईक, आप्तेष्ट व आजूबाजूच्या इसमांना नाहक त्रास देवुन त्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ तसेच अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेली कॉलिंग सेंटर चा पर्दाफाश करण्यात तसेच ग्राहकाची फसवणूक करून त्याच्या नावे बनावट सिमकार्ड काढणाऱ्या व्ही.आय कंपनीच्या प्रतिनिधीला खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात यश आले असून चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर गुन्हा रजि. नंबर ६३२/२०२४ भादंवि कलम ५०४, ५०६, ५०९. ४२०, ३४ प्रमाणे दिनांक ०२/०७/२०२४ रोजी दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना त्यांच्या  मोबाईल नंबरवर वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून फोन करून त्यांच्याशी आर्वाच्च भाषेत शिवीगाळी करून, त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबाबत तक्रार दिली आहे. सदर बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
प्रस्तुत गुन्ह्याच्या तांत्रिक विश्लेषनामध्ये यातील फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल येणाऱ्या मोबाईल नंबर धारक मंगेश हरेश सुतारे (वय: ३४ वर्षे), धंदा मासेमारी, राहणार: गोमा गल्ली, सुतारे हाऊस, रामले मार्ग, अंधेरी वर्सोवा, मुंबई-६१ यांना बोलावुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर मोबाईल नंबर कधीही घेतला नसल्याचे पोलीसांना सांगितले. त्याप्रमाणे वायरलेस कनेक्ट, मिनी स्टोअर्स, यारी रोड, अंधेरी पश्चिम येथील व्हीआय कंपनीचा प्रतिनिधी १) राहुलकुमार टिळकधारी दुबे (वय: ३३ वर्षे), धंदा: व्ही.आय प्रतिनिधी, राहणार, रूम नंबर ४०१, सी/६, एच.डी.आय.एल बिल्डिंग विरार पुर्व याच्याकडे चौकशी केली असता त्याने कंपनीने दिलेले टार्गेट पुर्ण करण्याकरीता त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची फसवणुक करून त्यांच्या नावावर दोन ते तीन सिमकार्ड काढत असल्याचे सांगितले. त्यापैकी एक सिमकार्ड ग्राहकाला देवून उरलेली सिमकार्ड त्याने लोन रिकव्हरी टेली-कॉल सेंटर 'सिटीझन कॅपीटल' पत्ता ऑफीस १०१, स्टार मनोर को ऑप हौसिंग सोसायटी, कॅबीन क्रॉस रोड, भाईंदर (पुर्व) यांना दिले असल्याचे सांगितले. सदर  आरोपी यास दिनांक ०३/०७/२०२४ रोजी २३.५५ वाजता अटक करण्यात आली आहे. त्याप्रमाणे लोन रिकव्हरी टेली कॉल सेंटर 'सिटीझन कॅपीटल, भाईंदर येथे छापा टाकुन पुढील इसमांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता कॉलसेंटर चालक मालक २) शुभम कालीचरण ओझा (वय: २९ वर्षे) राहणार: ए/विंग, २०१ चंदन व्हॅली, शिवार गार्डनसमोर, मिराभाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), ठाणे याने सदर सिमकार्ड हे लोन रिकव्हरी टेली-कॉलिंग करीता वापरलेले आहेत व टेलीकॉलर ३) अमित मंगला पाठक (वय:३३ वर्षे), धंदा: टेलीकॉलर, रा. वनराई चाळ, रूम नंबर ०५, राथोडी, मिरा मेडीकल जवळ, मालाड (पश्चिम) मुंबई याच्याकडे 'स्लाईस फायनांस', 'कोटक बँक', 'आयडीएफसी फर्स्ट बँक' यांच्या लोन रिकव्हरी करीता ऍग्रीमेंट करून देण्यात आले आहे. त्यांनी फिर्यादी यांनी कोणतेही लोन/कर्ज घेतलेले नसतानाही त्यांना फोन केले व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील दोन्ही आरोपींना दिनांक ०५/०७/२०२४ रोजी ०५.५० वाजता अटक करण्यात आलेली आहे. सदर तीनही आरोपींना दिनांक १०/०७/२०२४ रोजी न्यायालयाकडून पोलीस कोठडी रिमांड सुनावला आहे. सदर आरोपींकडून कॉम्पुटरमधील ४ एसएसडी हार्डडिस्क, १ जीएसएम गेटवे, १ टीपी लिंक कंपनीचा २४ पोर्ट स्विच, १ राऊटर, ३ मोबाईल असा एकूण ७७,३००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे नेमणूक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर हे करीत आहेत.
खंडणी विरोधी पथकातील पोलीसांकडून ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेली कॉलिंग सेंटर मधील इसम हे पुरूष व महीलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ अथवा अश्लील भाषेत बोलुन त्रास देत असतील तर त्यांनी संबंधीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.
सदरची कारवाई मा.आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर, मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) ठाणे, मा. राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२ गुन्हे शाखा, ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष कृती दल ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे, मपोनि. वनिता पाटील, सपोनि. सुनिल तारमळे, भुषण कापडनिस, श्रीकृष्ण गोरे, पोउपनिरी. विजयकुमार राठोड, सपोउनि. सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर, पोहवा. सचिन शिंपी, संदीप भोसले, आशिष ठाकुर, संजय राठोड, गणेश गुरसाळी, योगीराज कानडे, निलेश जाधव, मपोहवा. शितल पावसकर, चापोना. भगवान हिवरे, पोशि. तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, ढाकणे, मपोशि. मयुरी भोसले, चामपोशि शार्दुल यानी केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत