BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेचा लंडन स्थित एलओएसडी डॉ.परीन सोमानी यांच्या सोबत एमओयु करारनामा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०५: एखादी गोष्ट एकमेकांच्या सामंजस्याने करणे म्हणजेच करार होय. दिनांक ५ जुलै रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये लंडन स्थित प्रोफेसर डॉ. परिन सोमानी आणि 'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या मधे सामंजस्य करार स्वरूप आणि  साचा म्हणजेच एमओयु (मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग) ह्या करारावर सह्या झाल्या.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रमुख पाहुणे व सर्व पदाधिकारी यांनी सरस्वती पूजन केले, नंतर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन प्रोफेसर डॉ. परिन सोमाणी व त्यांच्या कन्येचे स्वागत केले.
प्रमुख वक्त्या प्रोफेसर डॉ.परीन  सोमानी यांनी "कौशल्य विकास" (स्किल डेव्हलॉपमेंट) या विषयावर परिसंवाद घेतला. त्यांच्या बरोबरच त्यांच्या कन्या ही ह्या कार्यक्रमात सहभागी होत्या. विद्यार्थ्यांना अचूकपणे करिअर निवडताना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते, तर करिअर घडवण्यासाठी स्वतः मधल्या कौशल्यांचा विकास करणे गरजेचे आहे, त्यासाठी गोंधळून न जाता आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे, ह्या सर्व गोष्टी परिसंवाद चर्चेत डॉ. परीन सोमानी ह्यांनी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सांगितल्या. वेळेचे नियोजन, अखंडता, आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करा. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करून स्वतःला आत्मविश्वासाने जागतिक स्पर्धेमध्ये झोकून द्या असे सांगून डॉ. परीन सोमाणी ह्यांनी मुलांना काही प्रश्न विचारले व मुलांनीही आत्मविश्वासाने उत्तरे दिली.
संस्थेच्या मधुबन वातानुकुलीत दालनामधे ह्या परिसंवादाचे आयोजन केले गेले, २०० पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच शिक्षकांनी हजेरी लावली होती. आजचा दिवस हा मणिकांचन योग समजावा असा आहे, बऱ्याच कालावधीच्या प्रतीक्षेनंतर एमओयु चा विश्वासदर्शक करार सर्वांच्या साक्षीने ह्या 'जे एम एफ' च्या वास्तूमध्ये झाला, ह्याचा आम्हा उभयतांना व सर्व जे एम एफ कुटुंबाला आनंद आणि अभिमान वाटावा असेच आहे, कॅम्ब्रिज, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वाटा शाळेतील विध्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी उद्गार काढले, तर स्वप्नांना  मोकळी वाट करून देण्यासाठी उघड्या डोळ्यांनी वास्तवता स्वीकारून ती स्वप्न साकार करा असे डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले.
परिसंवाद झाल्यावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी प्रमुख पाहुण्यांना शाळा आणि महाविद्यालयाला भेट दिली. सर्व वर्गात जाऊन डॉ. परीन सोमाणी यांनी मुलांना भेट दिली, त्यांच्याशी संवाद साधला, तर संगीत कक्षात जाताच सर्व मुलांनी 'जे एम एफ' संस्थेचे स्वागत गीत गाऊन त्यांचे स्वागत केले. संस्थेचे कार्य आणि शाळा, कॉलेज बघुन व केलेले आदरातिथ्य बघुन अतिथी डॉ. परीन सोमानी भारावून गेल्या. 'वंदे मातरम्' ने कार्यक्रमाची सांगता झाली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत