BREAKING NEWS
latest

२४ तासाच्या आतमध्ये गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण, कडुन खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०२:  कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हददीत १०० फुटी रोड, हाजीमंलग रोडलगत दिनांक ०१/०७/२०२४ रोजी कल्याण पुर्व येथे मयत इसम नामे संदिप नंदु राठोड (वय: २६ वर्षे) याचा अनोळखी ०५ इसमांनी त्याच्या डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर व पोटावर चॉपरने व त्यांचेकडील धारदार हत्याराने वार करून त्यास गंभीर दुखापत करून जिवे ठार मारल्याबाबत प्रेम विनोद चव्हाण याचे फिर्यादीवरून कोळशेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ७६८/२०२४ बी एन एस २०२३ चे कलम १०३(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० मपोका कलम ३७ (१), (३), १३५ शास्त्र अधिनियम ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर नमुद गुन्ह्याच्या घटनास्थळी इकडील घटकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी तात्काळ भेट देवुन नमुद गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर इकडील घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, वरील  नमुद सशंयीत आरोपी हे इगतीपुरी रेल्वे स्टेशन जि. नाशिक येथे येणार आहेत. सदर गुप्त बातमीच्या अनुषंगाने इकडील घटकातील पोलीस अधिकरी व अंमलदार यांनी सापळा कारवाई करून प्रस्तूत सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपीत नामे १). शैफ उर्फ साहिल नसीर शेख (वय: २१ वर्षे) रा. स्वतःचे घर, मरीयम बी चाळ, जगदीश डेअरीच्या पाठीमागे, वालधुनी अशोकनगर, कल्याण पुर्व, २). विदयासागर तुलसीधरन मुर्तील उर्फ आण्णा (वय: २१ वर्षे) रा. रूम नं. ०६, एकविरा अपार्टमेंट फिप्टी फिप्टी ढाब्याचे पाठीमागे, पिसवली गाव, हाजीमंलग रोड, कल्याण पुर्व यांना घेवुन कल्याण गुन्हे शाखा  युनिट-३ कार्यालयात आले.

त्यानंतर नमुद संशयीत आरोपी यांचेकडे प्रस्तूत गुन्ह्याबाबत अधिक विचारपुस केली असता ताब्यात असलेल्या दोन्ही संशयीत इसमांनी माहिती दिली की, त्यांचे व मयत इसम यांच्यात पुर्वी झालेल्या भांडणातुन पुर्व वैमनस्य असल्याने त्यांनी व त्यांचे इतर साथीदार पहिजे आरोपी यांनी मिळुन मयत इसम संदिप नंदु राठोड (वय: २६ वर्षे) यास डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर व पोटावर चॉपरने व त्यांच्याकडील धारदार हत्याराने वार करून त्यास गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले असल्याचे सांगितले. त्यांनतर नमुद संशयीत आरोपी यांच्यावर नमुद गुन्ह्यात सहभाग असल्याची त्यांनी कबुली दिल्याने दोघांना पुढील कारवाई करीता कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अशा प्रकारे गुन्हे शाखा घटक-३ कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी २४ तासाच्या आत तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. निलेश सोनावणे सहा पोलीस आयुक्त, (शोध-१) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि. संदिप चव्हाण, संतोष उगलमुगले, सहा पो उपनि. दत्ताराम भोसले, पोहवा. रमाकांत पाटील, अनुप कामत, प्रशांत वानखेडे, विलास कडु, गोरखनाथ पोटे, पोना. दिपक महाजन, सचिन वानखेडे, पो.कॉ. मिथुन राठोड, गुरूनाथ जरग, रविंद्र लांडगे, चालक पोहवा. अमोल बोरकर यांनी केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत