डोंबिवली दि.०६: राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ही संस्थानाच्या गुणवत्ता दर्जाला समजण्यासाठी महाविद्यालय, विश्वविद्यालय, आणि इतर मान्यता प्राप्त विद्यालय त्यांच्या उच्च स्तरावरील मूल्यांकन आणि मान्यता ची व्यवस्था करते, तसेच विद्यार्थ्यांसाठी सुविधा लक्षात घेऊन त्या पुरविण्याचा प्रयत्न करते. 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित वंदे मातरम् पदवी महाविद्यालय येथे दिनांक १३ आणि १४ जून रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) समिती ने हजेरी लावली होती. समिती पदावर रुजू असलेले उच्च पदाधिकारी अध्यक्ष, प्राध्यापक डॉ.धरमेंदर कुमार, (हरियाणा) समन्वयक निबंधक, डॉ.जोगेश काकटी, (आसाम) सदस्य मुख्याध्यापक डॉ.अनिलकुमार सुरेंद्र (कर्नाटक) ह्या मान्यवर व्यक्ती वंदे मातरम् पदवी महाविद्यालयात महाविद्यालयाची तपासणी करण्यासाठी येऊन गेले होते.
दोन दिवसाच्या कामकाजामध्ये मूल्यांकन, मूल्यमापन ,संशोधन, स्पष्टीकरण, विचारांची देवाघेवाण, विद्यार्थ्यांचे भविष्याबाबत नियोजन महाविद्यालयाचे सुसज्ज यंत्रणा, टापटीप पणा, समयसूचकता, कामकाजाची परिपूर्णता ह्या सर्व गोष्टींची दाखल घेऊन समिती सदस्यांनी महाविद्यालयाला पडताळणी करून वंदे मातरम् महाविद्यालयाला दि.२२ जून २०२४ रोजी NAAC समितीने "B++" CGPA 2.91 ह्या दर्जाच्या श्रेणीने नामांकन मिळाले. या यशा चे सर्वस्वी श्रेय वंदे मातरम् महाविद्यालयाचे प्राचार्य, उप-प्राचार्या, समन्वयक, सर्व प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी, यांना दिले जाते.
नैसर्गिक जबाबदारी आणि कर्तव्य, व जागरूकता म्हणून संस्थेचे संघटन, जबाबदारी, कर्तव्य, बांधिलकी, नियोजन ह्या विचारांचा समावेश असणे गरजेचे आहे. आणि हेच विचार अस्तित्वात आणून संस्था आणि विद्यार्थी, शिक्षक वर्ग कार्यरत असतो. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे त्याच बरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.नाडर सर, उप प्राचार्या सौ. वनिता लोखंडे, प्राध्यापिका मंजुळा मॅडम, तसेच इतर प्राध्यापक यांनी संध्याकाळी संस्थेच्या मधुबन वातानुकूलित दालनात महाविद्यालयाला मानांकन श्रेणी मिळाल्याने असाच 'Thanks Giving Ceremony' विद्यार्थी वर्गासाठी करण्यात आला होता.
जल्लोत्सव साजरा करण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले त्यामधे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग नोंदवत केलेल्या नृत्यांमुळे महाविद्यालयात सांस्कृतिक वातावरण तयार झाले. शिक्षकांनी एक छोटेखानी नाटक सादर केले व सर्वांनी या आभार प्रदर्शन कार्यक्रमाचा आनंद घेतला.
शैक्षणिक, अध्यापन सांस्कृतिक, संशोधिका ह्या सर्व गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी "NAAC" राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद महाविद्यालयात बोलावली जाते. संस्थेचे उद्दिष्ट हेच की वंदे मातरम् महाविद्यालय मध्ये जास्तीत जास्त सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, आपल्या महाविद्यालयाचा दर्जा उच्चपटी ने वाढवणे हेच ध्येय आहे, असे सांगून डॉ.राजकुमार कोल्हे यांनी या यशात सहभागी असलेल्यांचे आणि निमंत्रित सर्व पत्रकार व आलेल्या प्राचार्य महोदय व प्राध्यापक महोदयाचे आभार मानले व सर्वांना भेटवस्तू दिल्या.
शिक्षण आणि संस्कृतीचे माहेरघर असलेल्या डोंबिवली शहरामध्ये "वंदे मातरम् पदवी महाविद्यालय" च्या शिरपेचात यशाचा आणि मानाचा तुरा खोवला गेला होता. म्हणूंन सर्वांचे आभार मानण्यासाठी आजचा हा 'Thanks Giving Ceremony' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सर्वांनी ५६ भोग जेवणाचा आनंद लुटला आणि संस्थेचे संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे यांचे अभिनंदन करत धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा