BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील पत्रकार संघातर्फे 'होली ऍंजेल्स' शाळेचे संस्थापक संचालक डॉ.ओमेन डेविड यांचा सत्कार सोहळा संपन्न..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०५ : डोंबिवली पूर्वेकडील गांधी नगर स्थित पी.ऍंड.टी कॉलनी येथील 'होली ऍंजेल्स'(सीबीएसई) शाळेत, डोंबिवली पत्रकार संघातर्फे नुकताच शाळेचे संस्थापक संचालक डॉ.ओमेन डेविड सर यांचा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. होली एंजल्स शाळेचे संचालक डॉ.ओमेन डेविड सर यांची नुकतीच 'लोका केरला सभा' मध्ये निवड झाल्याबद्दल हा समारंभ पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आला होता. या समारंभास शाळेतील प्राचार्य बिजॉय ओमेन, मुख्याध्यापिका रफत शेख, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.