BREAKING NEWS
latest

'जे एम एफ शिक्षण संस्थेमध्ये 'हिंदी दिवस व 'शब्दाची ताकद' यावर सेमिनार उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  संविधान सभेमध्ये दिनांक १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी भाषेला भारताची राजभाषा हा दर्जा प्राप्त झाला, म्हणून 'हिंदी दिवस' संपूर्ण भारतात साजरा केला जातो. 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित 'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ व पदवी महाविद्यालयात देखील हिंदी दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ८९ वर्षीय आदर्श शिक्षिका श्रीमती तुळसाबाई लाकडे, 'जे एम एफ' चे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. हिंदी शिक्षिका सौ. ममता राय, सौ.सुप्रिया कांबळे, सौ.मानसी शिंगटे, सौ.सुरुची पांड्या, विधी गुप्ता तसेच विद्यामंदिर च्या हिंदी शिक्षिका सौ.कविता गुप्ता, मीना वटकर यांचा सत्कार आदर्श शिक्षिका श्रीमती तुळसाबाई लाकडे यांच्या हस्ते करण्यात आला.
हिंदी ही राजभाषा असल्याने, कोणत्याही राज्यात आपण गेलो तरी आपल्याला भाषेची अडचण मुळीच भासणार नाही. कारण हिंदी बोलता न येणारा व्यक्ती भारतात कुठेही शोधूनही सापडणार नाही, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगून आपल्या भाषेबरोबरच दुसऱ्या देखील भाषेवर प्रेम करा कारण माणूस हा भाषेतूनच आपुलकी, प्रेम, भावना व्यक्त करत असतो . अमेरिका, लंडन येथे शैक्षणिक दौऱ्यावर असताना दुसऱ्या देशातले देखील व्यक्ती आमच्या संपर्कात आले, त्यांचे देखील हिंदी भाषेतील बोलणे ऐकून आम्हाला गहिवरून आले, असे आपल्या भाषणात सांगितले.

हिंदी ही आई आहे तर मराठी ही मावशी आहे असे असले तरी त्याची भावना, आत्मीयता ही  एकच आहे असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगून ज्यावेळी अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात होते त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान आदरणीय इंदिरा गांधी जी यांनी पृथ्वीवरून त्यांना प्रश्न केला की वरून आपला भारत देश कसा दिसतो आहे, त्यावेळी एकच वाक्यात राकेश शर्मा उत्तरले की,'सारे जहा से अच्छा, हिंदोस्ता हमारा..' आणि आजही हे वाक्य ऐकताना, गाणे ऐकताना अंगावर शहारे येतात असे उद्गार डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले. कार्यक्रमाची रंगत वाढत असतानाच इयत्ता चौथी मधील विद्यार्थी व आठवी मधील विद्यार्थिनी प्रांजल मिश्रा हीने हिंदी दिवस वर आधारित भाषण केले, त्याच बरोबर इयत्ता चौथी मधील तन्वी मिश्रा या विद्यार्थिनीने डॉ. हरिवंश राय बच्चन यांची कविता सादर केली. इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनीने नृत्य सादर केले. तर इयत्ता तिसरी मधील विद्यार्थ्यानी मालकंस रागातील बंदिश सादर केली. संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी यांनी संवादिनी वाजवली. 'जन गण मन' विद्यामंदिर च्या मुलांनी देखील नाटक, नृत्य, गायन सादर केले. भाषेवर आक्षेप घेणे वाद विवाद करणे हे योग्य की अयोग्य ह्या विषयावर इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी वाद विवाद स्पर्धेचे आयोजन केले व प्रत्येक भाषेचे महत्व पटवून दिले. पदवी महाविद्यालय चे प्राध्यापक श्री. योगेश शिरसाट यांनी वर्ग प्रतिनिधी (मॉनिटर) वर एक भन्नाट विनोदी कविता ऐकवली , कविता ऐकत असतानाच मुलांनी हसून आणि  स्वतःच्या वर्ग  प्रतिनिधी कडे बघत कवितेला दाद दिली.
हिंदी दिवसाचे औचित्य साधून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी 'शब्दांची ताकद' ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. त्या प्रसंगी, शब्द हे फुलासारखे नाजूक  असतात ते कायमच जपून वापरावे असे आपल्या व्याख्यानात डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगून शब्दांचा भडिमार केल्याने मन दुखावले जाते त्यामुळे 'शब्दांची ताकद' ही प्रेमाने वाढवा असे सांगितले. क्षमा, चूक, धन्यवाद, कृपया , असे शब्द स्मितहास्य करून बोलले तर ऋणानुबंध निर्माण होतात. परंतु फुलासारखे कोमल शब्द जर तप्त निखाऱ्यासारखे झाले तर सर्वस्व ही नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, त्यामुळे शब्द जपून वापरा असे आपल्या व्याख्यानात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवी मधील सृष्टी व गार्गी या विद्यार्थिनींनी केले तर दहावी मधील भाग्यलक्ष्मी सचिन शिंगटे हीने आभार प्रदर्शन केले. सर्वांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत