कल्याण: दिनांक १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान २१ वी सब-ज्युनियर, ज्युनियर व सिनीयर जम्परोप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालय, नांदेड या ठिकाणी संपन्न झाली. सदर राष्ट्रीय स्पर्धेत पंजाब, जम्मू कश्मीर, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, यु.पी., दिल्ली अशा विविध राज्यातून जवळपास ३०० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविला. जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्र राज्याला घवघवीत यश मिळाले व अजिंक्यपद देखील मिळाले. राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाला. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, राष्ट्रीय जम्परोप संघटनेचे महासचिव साजाद खान, ऑलिंपिक निरीक्षक अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे तसेच महाराष्ट्र राज्य जम्परोप असोसिएशने सचिव दिपक निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील मुले व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ठाणे जिल्ह्यातील मुले व मुली यांनी ११ सुवर्ण पदके, ११ रौप्य पदके, ०२ कांस्य पदके अशी एकूण २४ पदके पटकावली. ठाणे जिल्ह्यातील मुले व मुली यांचे सराव शिबीर ठाणे जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या कार्यवाह लता पाचपोर मॅडम व इंडीया कोच अमन वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. महाराष्ट्राच्या यशात ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली त्याबद्दल कार्यवाह लता पाचपोर व प्रशिक्षक अमन वर्मा यांचे खूप कौतुक करण्यात आले.
सुवर्ण पदक - भुमिका नेमाडे, पद्माक्क्षी मोकाशी, दक्षिता देकाटे, योगीता सामंत, भाग्यश्री पाटील, पारोल झनकार, तन्वी नेमाडे, अनिश अयंकर, हर्षित शहा, विहंत मोरे, ईशान पुथरन
रौप्य पदक - काजल जाधव, वंश हिरोडे, वेदांत सरकटे, अवनी पांडे, नैवदया सिंग, ख्याती यादव, अनन्या यादव, रूद्र भगत, सुक्रुता बेंडाळे, अयंश रोठे, रोनक साळवे
कांस्य पदक - अयान यादव, पर्वा शिरसाठ
सदर राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत गुरुनानक इंग्लिश हायस्कूल, कल्याण या शाळेतील मुला मुलींनी देखील सहभाग नोंदविला होता व राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत गुरुनानक इंग्लिश हायस्कूल, कल्याण या शाळेतील मुला-मुलींनी ०८ रौप्यपदक व ०२ कांस्य पदक मिळविले. शाळेच्या मुला-मुलींनी अतिशय उत्तम व दर्जेदार कामगिरी केल्याबद्दल गुरुनानक इंग्लिश हायस्कूल, कल्याण या शाळेच्या मुख्याध्यापिका बलजीत कौर मारवाह मॅडम यांनी सर्व खेळाडूंचे खूप खूप कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा