BREAKING NEWS
latest

"गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी" उपक्रमातून शैक्षणिक सामग्री चे आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

काटई : मौजे काटई, डोंबिवली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन जयवंत पाटील यांच्या राहत्या घरी गणेशोत्सव काळात मागील नऊ वर्षांपासून "गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी" हा सामाजिक उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात ते गणपती दर्शना निमित्त येणाऱ्या साऱ्या गणेश भक्तांना शैक्षणिक साहित्य आणण्याचे आवाहन करत असतात आणि हे जमा झालेले शैक्षणिक साहित्य ते दुर्गम भागातील, आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करत असतात.