BREAKING NEWS
latest

मुंबई उत्तर-पश्चिममध्ये महाआरोग्य शिबिराची धूम, वायकरांचा अवयवदानाचा संकल्प!

वार्ताहर: संदिप कसालकर

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेत खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे भव्य विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा लाभ तब्बल 5 हजारांहून अधिक लोकांनी घेतला, ज्यात विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, उपचार, आणि औषधांचे विनामूल्य वाटप करण्यात आले.

शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे अवयवदानाचा संकल्प, ज्यात स्वतः खासदार रविंद्र वायकर यांनी सहभाग घेतला आणि अवयवदान फॉर्म भरून समाजासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. या शिबिरात दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर, वॉकर, चष्मे, आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.


शिबिरात आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि अ‍ॅलोपॅथिक उपचार पद्धतींचा समावेश होता, तसेच अस्थिरोग, मधुमेह, त्वचारोग, हाडांची तपासणी आणि इतर अनेक आजारांसाठी तज्ञ डॉक्टरांनी तपासण्या केल्या. शिबिराचे उद्घाटन खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले, आणि त्यांना रोटरी क्लब आणि इतर सेवाभावी संस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले.

शिवसेनेच्या या उपक्रमामुळे लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी खासदार वायकर यांचे आभार मानले आणि अवयवदानासारख्या सामाजिक कार्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत