डोंबिवली : नव तरुणांचा उत्साह आणि नवीन कला कौशल्यामध्ये सळसळणारे रक्त विजयाची खात्री दर्शवते. दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी, मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५७ व्या युवा महोत्सवामध्ये डोंबिवली शहरातील नामवंत 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर करून अंतिम फेरीमध्ये अनुक्रमे उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त करून वंदे मातरम् पदवी महाविद्यालय चे नाव मुंबई विद्यापीठात उंचावले.
नाट्य स्पर्धेमध्ये यश बडेकर, रोशन बर्डे, गौरी कागले, जया हलदार, सई कुडतुडकर, व कशिश मिश्रा यांचा सहभाग होता तर त्यांच्या साथीला आयुष सावंत, तन्मय वाडेकर, साहील सिंग होते. विद्यार्थी समन्वयक मयंक कोठारी व सव्या अंचन तसेच समन्वयक प्राध्यापिका मृणाल जाधव यांनी दुवा सांधला. संपूर्ण टीमला विजय मिळवण्यासाठी या सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले. एखाद्या स्पर्धेमध्ये जिद्दीने सहभागी होऊन व विजयाचे लक्ष्य केंद्रित करून आणि तो साध्य करून मिळवलेला विजय हा कितीतरी पटीने सगळ्यांनाच निस्वार्थी आनंद देणारा आहे, असे बोलून संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून यशाचा आनंद साजरा केला. संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व सहकार्य केलेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून विजयी पताका अशीच फडकवत ठेवा असा आशीर्वाद दिला. प्राचार्य डॉ. नाडर यांनी पण विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी विजयाचा चषक उंचावून केलेल्या अभिमानास्पद कामगिरीचा आलेख उंचावला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा