BREAKING NEWS
latest

भारतीय चलनाच्या बदल्यात परदेशी चलन देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिबली : मानपाडा पोलीस ठाण्यांच्या हददीत सुदामा नगर, एमआयडीसी फेज ०२, डोंबिवली पुर्व येथे राहणाऱ्या औषध विक्रेता यांना दिनांक ३१/०८/२०२४ रोजी तीन अनोळखी इसमांनी भारतीय चलनाचे एकुण १२ लाख रूपयांच्या बदल्यात दुबई देशाचे चलन असलेले एकुण ७०० दिराम देतो असे सांगुन फिर्यादी यांच्या कडुन भारतीय चलनाचे एकुण ४ लाख रूपये घेवून त्याबदल्यात फिर्यादी यांना दिराम न देता कागदी रददी बंडल देवुन ते पैसे असल्याचे भासवुन फिर्यादी यांची फसवणुक केली असल्याने फिर्यादी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यांत दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजी नंबर १००७/२०२४ बी.एन.एस कलम ३१८ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळया टिम तयार करण्यात येवुन गुन्ह्यातील आरोपी यांचा सर्वोत्तपरी शोध घेण्यांत आला. गुप्त बातमीदार तसेच आरोपीच्या वर्णनानुसार आरोपीचा शोध घेण्यात येत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गुप्त बातमी वरून त्यांनी निसर्ग हॉटेल, खोणी पलावा परिसरात सापळा रचला असता दोन संशयीत इसम यांना जागीच पकडुन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांने गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हददीत त्यांच्या साथीदाराच्या मदतीने फसवणुक करून चोरी केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यात आरोपी नामे १) मोहम्मद सोहेल हसमुददीन शेख (वय: ३० वर्षे) व्यवसाय कॅफे, रा. नेवाळी नाका हनुमान मंदिरजवळ, चाळ नं २, रूम नं. १३४, नेवाळीगाव ता. अंबरनाथ जि. ठाणे मुळगाव वी २८८, गल्ली नं ७, कावलनगर, जि. खजूरी नवी दिल्ली, २) मोहम्मद अबुबकर रज्जाक चौधरी (वय: ४१ वर्षे) व्यवसाय बिगारी रा. नेवाळी नाका हनुमान मंदिरजवळ, चाळ नं २, रूम नं १३४, नेवाळीगाव ता. अंबरनाथ जि. ठाणे मुळगाव खिलीमीस्ताव डालामिन उत्तर दिल्ली यांना अटक करण्यात आलेली असुन सदर आरोपीत यांचेकडुन १,७८,०००/- रूपये रोख रक्कम, एक युनायटेड अरब अमिरात सेंट्रल बँक नावे असलेली शंभर रूपये किंमतीचे दिराम व दोन मोबाईल फोन असे जप्त करण्यांत आलेले आहे. नमुद आरोपी यांचा एक साथीदार याचा शोध घेण्यात येत आहे. सदर कारवाईत मानपाडा पोलीस ठाणे पोलीसांनी  फसवणुक करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ - ३ कल्याण, सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुहास हेमाडे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सपोनि. संपत फडोळ, महेश राळेभात, प्रशांत आंधळे, सपोउपनि. भानुदास काटकर, पोहवा/राजकुमार खिलारे, पोहवा. शिरीष पाटील,.सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, दिपक गडगे, निसार पिंजारी, पोना. गणेश भोईर, प्रविण किनरे, यल्लापा पाटील, देवा पवार, अनिल घुगे, रवि हासे, पोशि. अशोक आहेर, विजय आव्हाड, महेद्र मंझा, नाना चव्हाण, घनश्याम ठाकुर यांचे पथकाने केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत