BREAKING NEWS
latest

गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी शिवसेनेकडून २३३ बस रवाना..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत एसटी बससेवेचे आयोजन करण्यात आले. बुधवारी कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहर आणि उल्हासनगर येथून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत २३३ हून अधिक बस रवाना केल्या गेल्या.

खासदार शिंदे यांनी सांगली येथून ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्व बसला भगवा झेंडा दाखवला. दिवा, कल्याण पूर्व आणि अंबरनाथ येथून सुमारे २९१ बस रवाना झाल्या.

पश्चिम महाराष्ट्रातही रवाना झाल्या बस

सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी, लांजा, खेड, चिपळूण, कुडाळ, मंडणगड, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर यासह कोकणातील विविध ठिकाणी बस रवाना करण्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये बस रवाना करण्यात आल्या आहेत, या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, रवी पाटील यांच्यासह शिवसेनेचे संतोष चव्हाण, नितीन पाटील, संजय पावशे, जनार्धन म्हात्रे आदी उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत