BREAKING NEWS
latest

व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याकरीता आलेल्या तीन इसमांना गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण पोलीसांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  गुन्हे शाखा घटक - ३ कल्याण चे सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दि. २७/०९/२०२४ रोजी दुपारी ०२:०० वाजण्याच्या सुमारास काही इसम मारुती सुझुकी कंपनीच्या राखाडी रंगाची वॅगनआर गाडी क्रमांक एमएच४६ - बीई ५४२६ मधुन व्हेल माशाची उलटी अनधिकृत रित्या जवळ बाळगून विक्रीसाठी डोंबिवली पूर्वेकडील बदलापुर पाईपलाईन रोड, मानपाडा येथे मोरया धाब्याच्या बाजूला येणार आहेत.

सदर मिळालेल्या बातमीच्या आधारे गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचत तीन संशयीत इसमांना व्हेल माशाची उलटी अनधिकृत रित्या जवळ बाळगून ती विक्री करण्याकरीता घेवुन आलेले असताना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

सदर सशंयीत इसमांकडे अधिक चौकशी करता त्यांची नावे १) अनिल राधाकृष्ण भोसले (वय: ५५ वर्ष) राहणार दत्त कृपा सोसायटी चाळ नं. ए/४४, रुम नं. १८, न्यु पनवेल, सेक्टर ६, जि. रायगड, २) अंकुश शंकर माळी (वय: ४५ वर्षे), राहणार कासव, मु.पो. आपटा रसायनी, पनवेल, गांव, जि. रायगड, ३) लक्ष्मण शंकर पाटील (वय: ६३ वर्षे) राहणार मु.पो. वांवजे गाव, मोहोदर, ता. पनवेल, एमआयडीसी, तलोजा, नवी मुंबई अशी असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर तीन इसमांची व त्यांच्या ताब्यात असलेल्या वॅगनआर गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ५ किलो ६४२ ग्रॅम वजनाची रुपये ६,२०,००,०००/- (सहा करोड वीस लाख रूपये) किंमतीची सफेद रंगाच्या पिशवीमध्ये सेलो टेप लावुन गुंडाळलेली व्हेल माशाची उलटी सापडली.

वरील नमुद तीन्ही इसमांच्या ताब्यातुन व्हेल माशाची उलटी, एक मारूती सुझुकी कपंनीची वॅगनआर गाडी, तसेच विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण ६,२२,१५,०००/- रूपये किमतीची मुदद्दे‌माल जप्त करण्यात आहे. सदर तिन्ही इसमांनी आपसात संगनमत करुन व्हेल माशाची उलटी बेकायदेशीर रित्या जवळ बाळगून त्याची वाहतुक करुन विक्री करण्याचा प्रयत्न केला म्हणुन त्यांच्याविरुध्द मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. १०८५/२०२४ वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४४,४८,४९(सी), ५१,५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण कडुन करण्यात येत आहे. 
सदरची यशस्वी कामगिरी मा.पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा.शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, (शोध - १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि. संतोष उगलमुगले, संदिप चव्हाण, सपोउनि. दत्ताराम भोसले, पोहवा. विश्वास माने, विलास कडु, पोकॉ. गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे यांनी केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत