डोंबिवली दि.०३ : 'जाह्णवीज मल्टी फाउंडेशन' संस्थेचे वंदे मातरम डिग्री महाविद्यालय डोंबिवली पश्चिम येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे यांनी 'ऑपेरेशन बजेट २०२५-२०२६' या विषयावर कार्यशाळेचे आज दि. ०३/०२/२०२५ सोमवार रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेच्या मधुबन हॉल येथे आयोजन केले होते.
१ फेब्रुवारी २०२५ रोजी सन्मा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या २०२५-२६ च्या बजेटवर चर्चासत्र आणि माहिती देण्यासाठी एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या बऱ्याच वर्षापासून १ फेब्रुवारी रोजी देशाचा बजेट सादर करण्यात येते यात इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली बजेट सादर करण्याची वेळ का बदलण्यात आली याची माहिती देण्यात आली. या सेमिनारमध्ये डॉ. राजकुमार कोल्हे यांनी 'ज्ञान' (GYAN) म्हणजेच Garib, Youth, Annadata & Nari अशा गोष्टींचा उहापोह केला. बजेट मध्ये उल्लेख केलेल्या सर्व गोष्टीचा समावेश करण्यात आला. देशाची अर्थ व्यवस्था कशी मजबूत करता येईल आणि दवशाचा 'जीडीपी' (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) कसा वाढेल याकडे लक्ष देण्यात आल्याचेही सांगितले. आयकर भरण्यामध्ये आपला देश तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगत इतर विकसित देशामध्ये असलेली अर्थ व्यवस्था कशी मजबूत आहे याचाही विचार मांडण्यात आला. अनेक विषयावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या विचारलेल्या प्रश्नांचे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी समाधान केले.
सदर सेमिनारसाठी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण ३०० जणांचा सहभाग होता. सदरच्या सेमिनार मुळे विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक वर्ग यांच्या ज्ञानामध्ये बजेट संबंधी भर पडली. या कार्यशाळेत संस्थेच्या सचिव डॉ. सौ. प्रेरणा राजकुमार कोल्हे, संस्थेच्या खजिनदार जाह्णवी कोल्हे ह्याही उपस्थित होत्या. तासाभराच्या सेमिनार नंतर वंदे मातरम ने या कार्यशाळेची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा