डोंबिवली : परीक्षांमध्ये मिळवलेले गुण ही विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करते. नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक परीक्षांच्या निकालामध्ये 'जन गण मन' कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वच मुलांना उत्कृष्ट गुण मिळाले. त्यामध्ये विशेष दहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून जन गण मन कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव उच्च स्तरावर नेऊन ठेवले.
सानवी वालणकर, एंजल उपाध्ये, इलियास खान, तेजल पवार, आलोक मौर्या, रितिका भट, खुशी चौहान, अनुष्का कवडीआ, प्रियांशु गिरप, सिद्धेश जाधव या सर्व विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ७५ ते ९० टक्के गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ह्या सर्व दहा विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व कौतुक केले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच शिक्षणाचा पाया रोवला जातो, त्यामधे सातत्य, खेळ, हसत खेळत अभ्यास अशा गोष्टींचा चढता उतरता क्रम असतो व शेवटी बारावी सारख्या महत्वाच्या टप्प्यावर करिअर निवडण्याची संधी आणि वेळ येते, अशा वेळी योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य ते क्षेत्र निवडा असा सल्ला संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्व उत्तीर्ण व उत्कृष्ट गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिला.
लहानपणापासूनचे आपले मित्र हे ध्येय ठरवण्यापर्यंत आपल्याबरोबर असतात, परंतु नंतर सर्वांचे मार्ग प्रत्येकाच्या ठरवलेल्या वेगळ्या ध्येयानंतर विभक्त होतात, वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक अशा अनेक क्षेत्रा मध्ये आपण आपले करिअर करू शकता असे सांगून सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. पुन्हा एकदा सर्व उत्तीर्ण, घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा