संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)
अभद्र संपादकाचा असली चेहरा! पत्रकारितेच्या मुखवट्याआड लपलेला बलात्कारी अंबादास भालेराव उघड झाला!
ठाणे (कल्याण) | न्यायाच्या आसऱ्याने पत्रकार संघटनेत काम करणाऱ्या एका महिलेवर संपादक असल्याचा दावा करणाऱ्या अंबादास भालेराव या नराधमाने वर्षानुवर्षे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महिला पत्रकाराच्या आयुष्याचा खेळ करून, तिचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत बलात्कार करत राहिला आणि ५ लाख रुपये उकळले.
घटनेचे तपशील – विश्वासघात, जबरदस्ती आणि ब्लॅकमेलचा भयाण खेळ!
-
पीडित महिला 2018 मध्ये श्रमीक पत्रकार संघटनेत महिला संघटक म्हणून काम करत होती.
-
अंबादास भालेराव हा तिला भेटला आणि आपण न्यूज चॅनलचा संपादक असल्याचे सांगितले.
-
"तू चांगले काम करतेस, माझ्यासोबत जॉईन हो" असं म्हणत जवळीक वाढवली.
-
तिचा विश्वास संपादन करून तिला 2019 मध्ये घरी जाऊन बलात्कार केला.
-
या घटनेचे व्हिडिओ शूट करून “तुझ्या नवऱ्याला सांगितलंस तर व्हायरल करीन” अशी धमकी दिली.
-
नंतर कल्याणमधील आदित्य हॉटेल, साईदीप हॉटेल याठिकाणी तिला नेऊन वेळोवेळी जबरदस्ती केली.
-
या सर्व काळात एकूण ५,००,००० रुपये रोख स्वरूपात उकळले.
-
2024 मध्ये पीडित महिलेने त्याच्याशी संबंध तोडले.
-
तरीही भालेराव हा तिला वारंवार संपर्क करून पुन्हा संबंध ठेवण्याचा दबाव टाकू लागला.
कायदेशीर तक्रार दाखल!
-
FIR नं: 0331/2025
-
पोलीस ठाणे: टिळकनगर, ठाणे शहर
-
भारतीय न्याय संहिता अंतर्गत अंतर्गत गंभीर कलमे –
-
कलम 64(1): जबरदस्तीचा लैंगिक संबंध
-
कलम 351(2): शारीरिक छळ व धमकी
-
कलम 115(2): आर्थिक फसवणूक व ब्लॅकमेलिंग
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा