दिवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलांना ठाण्यात तिकीट नाकारले पण त्याचवेळी दिव्यात माजी उपमहापौर रमाकांत मढवींच्या मुलीला तर डोबिंवलीत आमदार मोरेंच्या मुलाला कसे तिकिट दिले गेले. यावर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ठाण्यातील खासदार, आमदार यांच्या मुलांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने शिंदे सेनेत नाराजीची लाट उसळली आहे. पण तेच उलट दिवा, डोंबिवलीत जल्लोष पहायला मिळाला.
ठाण्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पण तेव्हाच दिव्यातील माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांची मुलगी साक्षी मढवी हिला दुसऱ्या दोन टर्म असलेल्या नगरसेविकेची तिकिट दिली गेली. तर डोंबिवलीतील आमदार राजेश मोरे यांच्या हर्षल मोरे याला तिकिट दिले गेले. शिंदेंचा ठाण्यात वेगळा न्याय आणि दिवा, डोंबिवलीत वेगळा न्याय का?असा सवाल नागरिक विचारत आहेत. सर्वांना समान न्याय मिळावा असे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा