डोंबिवली : डोंबिवली शहरातील मानपाडा रोड येथील श्री कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या सायली सौरभ चव्हाण या कन्येने जिद्द, चिकाटी आणि अथक चार वर्षांच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर थेट सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (अधिकारी वर्ग–१) या प्रतिष्ठित पदाला गवसणी घातली आहे.
सायली चव्हाण यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशामागे मोलाची साथ देणाऱ्या आई- वडिलांसह सासरकडील कुटुंबीयांचाही यावेळी आवर्जून गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत सायली चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाला सुरज मराठे, ज्योती मराठे, विवेक खामकर, हर्षल मोरे, संजय निकते, दीपाली पाटील, अक्षय सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सायली चव्हाण यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. सायली चव्हाण यांचे हे यश डोंबिवलीसह संपूर्ण परिसरातील तरुण-तरुणींना प्रेरणादायी ठरणारे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा