डोंबिवली - दिनांक ७ जानेवारी रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४११/२०१६ भा.द.वि. कलम ३२४, ३४ या गुन्ह्यातील आरोपी १) विनोद जगन्नाथ कांबळे, राहणार: पुतळाबाई चाळ, अशोकनगर वालधुनी, कल्याण पुर्व, व २) नागसेन उर्फ नागेष जगन्नाथ कांबळे, राहणार: वरील प्रमाणे हे वेळावेळी त्यांचा ठाव ठिकाणा बदलुन राहत असून ते सापडत नसल्याने आरोपींना हजर करण्याकरीता मा. न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग पहिले न्यायालय,कल्याण यांनी दि. १७/०१/२०२३ रोजी जाहिरनामा काढलेला होता. सदर आरोपी अद्याप सापडत नसल्याने त्यांचा कसोशीने शोध घेवुन सदर दोन्हीही आरोपी हे काल्हेर भिवंडी येथे राहत असल्याबाबत पोशि.गोरक्ष शेकडे यांना त्यांच्या गुप्तबातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा,घटक-३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहा. पोलीस उप निरीक्षक दत्ताराम भोसले, पोहवा. विजय जिरे, विलास कडु, गोरक्ष शेकडे, दिपक महाजन, गुरुनाथ जरग, गणेश हरणे, पांडुरंग भांगरे, सचिन भालेराव, सतीश सोनवणे यांनी काल्हेर गांव हल्दीराम गोडऊनच्या मागे, सीजी पार्क बिल्डींगजवळ भिवंडी येथे सापळा रचुन फरारी आरोपी १) विनोद जगन्नाथ कांबळे, २) नागसेन उर्फ नागेष जगन्नाथ कांबळे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीकामी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
मा. कल्याण कोर्टाने जाहीरनामा प्रसिद्ध करून सदर दोन्ही आरोपी हे फरार घोषित करून शोधण्याचे व समक्ष हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते, सदर आरोपी हे दोन्ही सख्खे भाऊ असून एका गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात मा. कोर्टाने त्यांना फरार घोषित केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा