BREAKING NEWS
latest

दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी डोंबिवली वाहतूक शाखा तर्फे विशेष बाईक राईडची सुविधा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेदरम्यानचा प्रवास सुकर व्हावा आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागू नये, यासाठी डोंबिवली शहर वाहतूक उपविभागाचे प्रभारी आयुक्त श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष बाईक रायडर्सची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
परीक्षार्थी विद्यार्थी जर कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले, तर त्यांना तात्काळ मदत मिळून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावे, या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक 8655654184 देण्यात आला असून, या क्रमांकावर संपर्क साधताच संबंधित भागातील वाहतूक बाईक रायडर्स विद्यार्थ्यांना त्यांचं ठिकाणाहून थेट परीक्षा केंद्रावर सोडणार आहेत.

पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हे ट्रॅफिक रायडर्स संपूर्ण ठाणे शहरात कार्यरत राहणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी वेळेच्या ताणातून दिलासा मिळणार असून, पालकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत