BREAKING NEWS
latest

कोपरमधील विद्यार्थ्याचा परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून अपघाती मृत्यू..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.१० फेब्रुवारी - बारावीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून कोपरमधील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. डोंबिवलीतील कोपर येथे राहणारा सोहम सचिन कठरे हा विद्यार्थी बारावीची परीक्षा देण्यासाठी कळवा येथील मनिषा विद्यालय या परीक्षा केंद्रावर जाणार होता. यासाठी तो कोपरहून कळव्याला जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होता.

दरम्यान, मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या लोकलमधून पडून सोहमचा अपघाती मृत्यू झाला. लोकलमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत