BREAKING NEWS
latest

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे ‘बालमेळा २०२६’ यशस्वीरित्या संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या वतीने GEI’s 'ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल', डोंबिवली येथे नुकताच ‘बालमेळा २०२६’ या भव्य सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. डोंबिवली परिसरातील सुमारे २० शाळांमधील ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या बालमेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. चित्रकला, वक्तृत्व, निबंध लेखन, वादन, समूह गायन, समूह नृत्य व रोटरी हास्यजत्रा अशा विविध स्पर्धांचा या उपक्रमात समावेश होता.

उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-नियुक्त  श्रीजीत पूतन आणि  डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. विनेश नायर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ ३१ जानेवारी रोजी रोटरी भवन, डोंबिवली येथे पार पडला. यामध्ये सर्वोत्कृष्ट शाळा (विजेती) – 'ओंकार इंग्लिश मिडियम स्कूल' (सीबीएसई), सर्वोत्कृष्ट शाळा (उपविजेती) – GEI's 'ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल', तर उत्कृष्ट सहभागासाठी विशेष पारितोषिक – 'डॉन बॉस्को स्कूल' यांना प्रदान करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अध्यक्ष रो. डॉ. संदीप घरत, सचिव रो. विनायक आगटे, प्रकल्प संचालक रो. संतोष प्रभुदेसाई, प्रोजेक्ट चेअरमन रो. धनश्री मोने,  रो. अशोक तिरुवसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत