कल्याण - आयुक्त आशुतोष डुंबेरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील गुन्ह्यांचा तपास आणि शोध घेत गुन्ह्यांची उकल करण्यात कल्याण पोलीस परिमंडल-३ ने नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या प्रकटीकरणाच्या संख्येत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी केवळ अभिमानाची नाही तर पोलीस विभागाच्या समर्पणाचे आणि वचनबद्धतेचे जिवंत उदाहरण आहे. गेल्या वर्षात ३,००० हून अधिक गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल करण्यात आली आहे.
कल्याण विभाग परिमंडल-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या ही केवळ आकडेवारी नाही तर जनतेचे रक्षण करण्याच्या पोलीसांच्या दृढनिश्चयाचा आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा पुरावा आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम, धाडसी कारवाई आणि दिवसरात्र शिस्तबद्ध तपासातून हे उल्लेखनीय यश मिळवले आहे. उपायुक्त अतुल झेंडे म्हणाले की, पोलीसांची तत्परता, समर्पण आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी प्रेरणादायी आहे आणि नागरिकांचा सुरक्षेवरील विश्वास आणखी दृढ करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा