BREAKING NEWS
latest

मजदूर संघटनेच्या माध्यमातून नाका कामगारांना 'सुरक्षा संच' (सेफ्टी किट) चे वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील लेवा भवन सभागृहात नाका कामगारांना शासन योजनेंतर्गत गृहोपयोगी वस्तू, भांडी व अत्यावश्यक संच, सुरक्षा संच (सेफ्टी कीट) ज्या कामगार कार्यालयात ऑनलाईन नोंदणी झालेल्या आहेत, त्या कामगारांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, प्रसिद्ध कलाकार अक्षदा दास, समाजसेवक समीर जगे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश म्हात्रे, रिपाइंचे माणिक उघडे, मीना साळवे, समाधान तायडे, दिलखुश माळी, शिवसेना पदाधिकारी सुदाम जाधव, रेश्मा चिकटे, संघटनेचे सहखजिनदार रामचंद्र वाघ, संघटनेचे केंद्रीय कमिटी सदस्य रामेश्वर शेजूळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ म्हणाले, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने नोंदणीकृत नाका कामगारांना गृहउपयोगी वस्तू, भांडी व अत्यावश्यक संच देण्यात येते. परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे म्हणाले की, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना नेहमीच नाका कामगारांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असते. संघटनेच्या प्रयत्नात यश येत असून आजवर अनेक नाका कामगारांना याचा लाभ मिळाला आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत