मुंबई - ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळा-मधीला सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवि-ण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या 'पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप मध्ये खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली असून इंडोनेशिया दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ते करणार आहेत.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगातील पातळीवर मांडत होते. या मोहिमेत खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करत युएई, सिएरा लियोन, लायबेरिया आणि डी आर काँगो या देशांना भेट देत भारताची ठाम भूमिका प्रभावीपणे मांडली होती. त्यांच्या संयमी, अभ्यासू आणि ठाम मांडणीमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला बळकटी मिळाल्याचे मानले गेले. यापूर्वीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली परिसरातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि वाहतूक प्रकल्पांसाठी सातत्याने पाठपुरवठा केला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टीव्ही वाढविणे, मेट्रो व रेल्वे प्रकल्पांना गती देणे, तसेच मतदारसंघातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी मानली जाते.
युवा खासदार म्हणून संसदेतील सक्रिय उपस्थिती, विकासाभिमुख भूमिका आणि आंतरराष्ट्रीय विषयावरील अभ्यासू मांडणी यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 'पार्लेमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप'च्या माध्यमातून भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून विविध पक्षातील खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळे ६० हून अधिक देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि द्विपक्षीय सहकार्य यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा