डोंबिवली - डोंबिवली ते ठाणे दरम्यान वाढत्या लोकल रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना, नगरसेवक दिपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. कल्याण-डोंबिवली परिवहन महानगरपालिका (केडीएमसी) विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर दि. ४ मार्च २०२६ पासून डोंबिवली मोठागाव सर्कल ते ठाणे माजिवडा जंक्शन दरम्यान बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे डोंबिवलीकरांना सुरक्षित, सोयीस्कर आणि पर्यायी प्रवासाचा मार्ग उपलब्ध होणार असून लोकल रेल्वेवरील ताण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.
नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रशासनाला याची तातडीची जाणीव करून दिली होती. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, डोंबिवलीचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांनी देखील या विषयात सहकार्य व पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. ही सेवा पुढील काळात नियमित स्वरूपात सुरू ठेवण्यासाठी आणि अधिक बस फेऱ्या वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा