BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत ‘खासदार आपल्या भेटीला’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  कल्याण लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने रविवारी डोंबिवली पूर्वेतील जोंधळे विद्यालयात ‘खासदार आपल्या भेटीला - जनता दरबार’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक तसेच शासन स्तरावरील प्रलंबित समस्या खासदारांसमोर मांडल्या.
नागरिकांनी मांडलेल्या बहुतांश समस्यांवर उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांमार्फत जागेवरच तोडगा काढण्यात आला, तर प्रलंबित कामे प्राधान्याने आणि तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित विभागांना दिले. विविध नागरिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपल्या मागण्यांची निवेदने खासदारांकडे सादर केली. यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून घेणे नव्हे, तर त्यावर तातडीने कार्यवाही करून त्या सोडविणे ही जनप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे. याच उद्देशाने कल्याण लोकसभा मतदारसंघात ‘खासदार आपल्या भेटीला’ हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतो.

कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नगरसेवक तसेच केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत