BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'गीता जयंती' निमित्त 'इस्कॉन' चे चार्टर्ड अकाऊंटंट सुदामा दास प्रभूजींचे कीर्तन प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवत गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. सुमारे पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनला रणभूमीवर जीवनविषयक संदेश दिला व 'श्रीमद भगवत गीता' लिहिली गेली. हिंदू धर्मातील श्रीमद भगवत गीता हा जन माणसातील अमूल्य उपदेश  ठेवा  आहे. 'जे एम एफ' शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन इंग्लिश शाळा आणि विद्यामंदिर मध्ये देखील गीता जयंती उत्साहाने व धार्मिकतेने साजरी करण्यात आली. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी भगवत गीते मधील काही अध्याय कथन करून  शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी, सौ. आरती वैद्य व भक्ती पुरोहित यांनी त्याचा अर्थही समजाऊन सांगितला.
'हरे राम हरे कृष्ण' इस्कॉन मंदिरातील व्यवसायाने सनदी लेखापाल (सीए) असलेले अध्यात्मिक गुरू प्रभू श्री.सुदामा दास जी व त्याच बरोबर प्रभुजिंचे अध्यात्मिक शिष्य सहकारी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. जे एम एफ संस्थेचे संस्थापक माननीय डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांनी सर्व गुरूंचे शाल श्रीफळ व चांदीची लक्ष्मी देऊन स्वागत केले. सरस्वती पूजन व भगवत गीता पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम प्रभूजींनी 'गीते' बद्दल माहिती सांगून "हरे रामा हरे कृष्णा" चे उच्चारण केले. मधुबन वातानुकुलीत दालनांत जवळपास शाळेच्या इयत्ता सातवी ते दहावीची २५० विद्यार्थी तसेच १०० शिक्षक उपस्थित होते. सर्व मुलांनी भगवत गीता बद्दल सांशक प्रश्न विचारून प्रभूजींकडून समाधानकारक उत्तरे मिळवली. तदनंतर प्रभू श्री सुदामा दास व त्यांचे शिष्य या सर्वांनी मिळून टाळ मृदुंगाच्या गजरात 'हरे रामा हरे कृष्ण' चे कीर्तन करून सर्व विद्यार्थ्यांना कीर्तनात सामावून घेतले, सर्व विद्यार्थी तल्लीन होऊन कीर्तनात थिरकत होते. 'हरे रामा हरे कृष्णा' च्या गजराच्या लहरी सर्वत्र ठिकाणी लहरत होत्या.
  ज्याप्रमणे रणभूमीवर अठरा दिवस घनघोर युद्ध सुरू होते त्याच वेळी सृष्टीचा पालनकर्ता 'शारंगपाणी' हा धनुर्धारी धनंजयाला जीवन उपदेश करत होता, त्या जीवानचा सार तुम्हा आम्हाला चाखता आला ते म्हणजे केवळ भगवत गीते मुळेच. छल, कपट, निंदा ह्या पलीकडे जाऊन देखील एक शांततेचा मार्ग आहे आणि तो म्हणजे अध्यात्म, असे संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांना सांगितले. 'हरे राम हरे कृष्णा'च्या गजराने आपले मन पवित्र झाले तर अध्यायन आणि अध्यात्म यांचा निकटचा संबंध आहे म्हणून दोन्हीकडे लक्ष केंद्रित करून 'आत्मसात' करणे हेच महत्वाचे आहे असे संस्थेच्या  सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगितले. सर्व विद्यार्थी शिक्षकांना निःशुल्क भगवत गीता प्रदान करून गीता जयंतीचा प्रसाद देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील २७ गावं आणि १४ गावांतील जटिल पाणीप्रश्न लवकरच सुटणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावं आणि २७ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवनियुक्त आमदार श्री.राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज एमआयडीसी विभागाचे सीईओ व सदस्य सचिव श्री.पी.वेलारासू यांची भेट घेतली. सदर बैठकीत १४ गावं आणि २७ गावांमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर झालेल्या सखोल चर्चेनुसार सदरचा पाणी प्रश्न पुढील कालावधीत लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवण्यात येणार आहे. या चर्चेमुळे शिष्टमंडळासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिष्टमंडळाच्या बैठकीत शिवसेना विधानसभा संघटक श्री.बंडू पाटील, ज्येष्ठ समाजसेवक व शिवसैनिक श्री.दत्ता वझे, उप-तालुकाप्रमुख श्री.गणेश जेपाल, उप-तालुकाप्रमुख श्री.विकास देसले, विभाग प्रमुख श्री.किसन जाधव, विभागप्रमुख श्री.अनिल म्हात्रे, श्री.हितेश गांधी आदी मान्यवरांचा समावेश होता.
आमदार श्री.राजेश गोवर्धन मोरे यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली ही तातडीची कृती नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न १४ गावं आणि २७ गावांना पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे स्विय सहाय्यक अभिजित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.११ - कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अभिजित दरेकर हे स्विय सहाय्यक असून, त्यांचे जनसंपर्क चे कामकाज वाखाणण्याजोगे आहे. अभिजित हे मितभाषी असून, त्यांच्या स्वभावातला साधेपणा हा जनसंपर्क वाढविण्यासाठी चालना देणारा आहे. कल्याणचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उर्फ दादा यांचा पी.आर.(जनसंपर्क) ते उत्कृष्टपणे सांभाळत, त्यांना नित्यनेमाने पार्लमेंटची प्रशासकीय माहिती/संदेश देत असतात. त्यामुळे श्रीकांतदादांना दैनंदिन घडामोडींची अचूक माहिती मिळण्यास मदत होत असते.
श्रीकांतदादा आणि अभिजीत दरेकर यांच्यातील संबंध अतिशय चांगले, स्नेहपूर्ण व भावासारखे प्रेमळ आहेत. प्रामाणिकपणा, निष्ठा, कर्तव्यदक्षता अन् कठोर परिश्रम करण्याच्या भूमिकेतून त्यांनी दादांचं मन जिंकलं आहे. वेळप्रसंगी दरेकर हे नामदर एकनाथ शिंदे यांना देखील दैनंदिन कामकाजात सहाय्य करत असतात. दरेकर हे वास्तवात श्रीकांतदादांची सावली असून, ते दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत असतात.
केवळ कल्याण मतदारसंघातील नागरिकांनांच नव्हे तर, राज्यातील गोरगरीब, गरजू लोकांना वैद्यकीय कारणांसाठी अर्थसहाय्य मिळवून देण्यासंबंधी दरेकर हे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना हातभार लावत असतात. त्याची परिणती म्हणजे ते शिंदे परिवाराचे एक क्रियाशील सदस्य म्हणून मानले जातात. अत: दरेकर यांना पुनश्च वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा एवं पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक ! आणि शुभाशीर्वाद.