BREAKING NEWS
latest

५० घरफोड्या उकलून ५४,२०,१८०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा घटक-३ कल्याणच्या पोलीसांना यश..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १६/२०२५. बी.एन.एस, २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक-३ कल्याण कडुन करण्यात येत असतांना नमुद गुन्ह्याचे घटनास्थळ व परिसरात असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजचे तांत्रीक विश्लेषन करून संशयीत आरोपी १) लक्ष्मण सुरेश शिवशरण (वय: ४७ वर्षे) मुळ राहणार. हनुमाननगर रूपा भवानी माता मंदिराजवळ, जिल्हा सोलापुर सध्या राहणार. मोरया अपार्टमेंट, दुबे याच्या मालकीच्या खोलीत, रूम नं. १०८, छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ, कशेळी गाव, काल्हेर भिंवडी जि. ठाणे, यांस निष्पन्न करून त्यास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी भिवंडी येथुन सापळा लावुन मोठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आले. लक्ष्मण सुरेश शिवशरण यास अटक करून त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने चोरी केलेले सोन्याचे दागीने सुकेश मुददणा कोटीयन (वय: ५५ वर्षे) मुळ राहणार. मित कुलम्म हाऊस, पोष्टः आयकडी, ता. मंगलोर, जिल्हा:- मेंगलोर सध्या राहणार. सी विंग रूम नं. २१२, करण कॉम्पलॅक्स, जी.सी.सी क्लबजवळ, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड याच्याकडे विक्रीकरीता दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने सुकेश मुददणा कोटीयन यालाही अटक करून तपास करण्यात आला.
अटक आरोपी लक्ष्मण सुरेश शिवशरण याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येत असणाऱ्या परिसरात घरफोडी चोरीचे एकुण ५० गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याने तपासात त्याच्याकडुन घरफोडी करून चोरी केलेल्या गुन्ह्यातील ५३,४१, २८०/- रूपये किंमतीचे ६६७ ग्रॅम, ६६० मी.ली. वजनाचे सोन्याचे दागिने व ७८,९००/- रूपये रोख असा एकुण ५४,२०,१८०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकुण ५० घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
                             
प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि. संतोष उगलमुगले, पोउपनि. विनोद पाटील, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, अशोक पवार, बालाजी शिंदे, आदिक जाधव, विलास कडु, अनुप कामत, प्रंशात वानखेडे, गोरखनाथ पोटे, प्रविण बागुल, उल्हास खंडारे, सुधिर कदम, वसंत चौरे, सचिन वानखेडे, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे, मिनाक्षी खेडेकर, मंगल गावित चासपोउपनिरी अमोल बोरकर यांनी यशस्वीपणे केलेली आहे.

निळजे येथील लोढाहेवन रहिवासीयांनी मानले आमदार राजेश मोरे यांचे आभार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  निळजे येथील लोढाहेवन सोसायटी येथील पाण्याचा गंभीर प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. त्याबाबत सोसायटी सदस्यांची तक्रार श्री गजानन पाटील (उप-तालुका प्रमुख) यांच्या कडे वारंवार येत होती याच समस्याची दाहकता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कल्याण लोकसभा संसदरत्न श्रीकांत शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून आज अखेर या पाठपुराव्याला यश आले आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कामाचा उदघाटन समारंभ लोढाहेवन येथील स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केला होता.
नागरिकांनी आता पाण्याच्या टँकर पासून सुटका आणि टँकर कायमस्वरूपी बंद झाल्याने समाधान व्यक्त केले. याप्रसंगी नागरिकांनी केलेला भव्य दिव्य सत्कार समारंभाने मन अगदी भारावून गेले आणि नागरिकांनी दिलेल्या या प्रेमळ सत्काराचे मनापासून स्वीकार करत आमदार राजेश मोरे यांनी लोढाहेवन वासीयांचे आभार मानले.
या प्रसंगी शिवसेना पक्षाचे युवा सेनेचे जितेन पाटील, अर्जुन पाटील, बंडू पाटील तसेच विविध पदाधिकारी, महिला आघाडी आणि अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी : निजामपुरा पोलीस ठाणे, भिवंडी येथील गुन्हा रजि.नं. ५७९/२०२४, भा.द.वि. कलम ४२०,३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असताना, त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत इसम नामे जब्बार अजीज जाफरी (वय: ५८ वर्षे), व्यवसाय: ऑप्टीक्स, राहणार. वाशिंद पूर्व, ता.शहापूर, जि.ठाणे यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले होते. त्याचेकडे सदर गुन्ह्याच्या  अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने वरील नमुद सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीकडुन एकुण ९,२८,०००/- रूपये किंमतीचे ११६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असुन सदर आरोपीने यापूर्वी निजामपुरा, नारपोली, भोईवाडा, भिवंडी शहर, विठ्ठलवाडी व कळवा पोलीस ठाणे हद्दीत फसवणुकीचे ६ गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी श्री.अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शोध-१ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-२ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोउनि. रविंद्र बी. पाटील, पोहवा. शशिकांत यादव, किशोर थोरात, पोशि. उमेश ठाकुर, नितीन बैसाणे, मपोहवा. माया डोंगरे व श्रेया खताळ यांनी यशस्वीपणे केली आहे.

तब्बल सत्तावीस वर्षांनी दिल्लीत भाजपा पुन्हा सत्तेवर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली, दि.०८ : दिल्लीच्या मतदारांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला नाकारत तब्बल सत्तावीस वर्षांनी कमळ फुलवलं आहे. तब्बल २७ वर्षांनी देशाच्या राजधानीत भाजपाची सत्ता आली आहे. ७० जागांपैकी भाजपानं ४८ जागा जिंकल्या आहेत.
तर दोन वेळा एकहाती मोठा विजय मिळवलेल्या आम आदमी पार्टी (आप) पक्षाला फक्त २२ जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसला ह्या निवडणुकीत आपलं खातंही उघडता आलेलं नाही. भाजपाचे परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा ४००० मतांनी पराभव केला आहे तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देखील पराभूत झाले आहेत. भाजपाच्या रेखा गुप्ता, कपिल मिश्रा, मणिंदर सिंग सिर्सा, तिलक राम गुप्ता, उमंग बजाज, अरविंदर सिंग लवली यांचा विजय झाला आहे. ह्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाला दिल्लीकरांनी ही दिलेली पावती आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्यांनी दिली आहे.

मतदारसंघातून मुख्यमंत्री आणि आप नेत्या अतिशी मार्लेना विजयी झाल्या आहेत. मात्र, आम आदमी पार्टीचे सोमनाथ भारती आणि सत्येंद्र जैन हे दिग्गज नेते पराभूत झाले. आपचे नेते मनिष सिसोदीया यांनी पराभव स्वीकारत, पराजयाबद्दल विचारमंथन करणार असल्याचं म्हटलं आहे. आपचे अवध ओझा यांचाही पराभव झाला आहे. दिल्ली विधानसभेत दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सत्यैंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांना देखील पराभवाला सामोर जावं लागलं आहे. भाजपाचे रमेश बिधुडी, दुष्यंत गौतम यांचाही पराभव झाला आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित आणि अलका लांबा यांचा देखील पराभव झाला आहे.

अंमली पदार्थ विशेष पथकाच्या कारवाईत चरस, गांजा व एम.डी पावडर हा अंमली पदार्थ विक्री करणारे ४ जण पोलिसांच्या ताब्यात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : परीमंडळ-३ कल्याण मध्ये अवैध धंदयावर कारवाई करण्याकरिता विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन सदर पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण व पोलीस पथक हे संयुक्तरित्या खाजगी वाहनाने गस्त करीत असताना 
१) मानपाडा पोलीस स्टेशन हददीत सुदर्शन मार्बल समोर, सावित्रीबाई फुले नाटयगृह जवळ, एम.आय.डी.सी. रोड, डोंबिवली पूर्व येथे एक इसम नामे सनिल श्रीनाथ यादव, (वय: २५ वर्षे) राहणार. रूम नं २०२, नांदीवली टेकडी, आनंद बंगला डोंबिवली (पुर्व) हा त्याच्या ताब्यात एकुण ८.४८ ग्रॅम वजनाचा १६,५००/- रूपये किंमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उददेशाने जवळ बाळगलेला असल्याचा मिळुन आल्याने त्याचेवर मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १३६/२५ एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८ (क), २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
२) बाजारपेठ पोलीस स्टेशन हददीत दुर्गामाता चौक, भटेला तलाव येथील मोकळ्या जागेत, कल्याण पुर्व येथे इसम नामे शंकर महादेव गिरी, (वय: ४६ वर्षे), धंदा मजुरी राहणार. मुपो. टाकळी अम्या, ता. आष्टी, जि. बीड हा त्याच्या ताब्यात एकुण ९ किलो ९५० ग्रॅम वजनाचा १,००,०००/- रूपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळगलेला असल्याचा मिळुन आल्याने त्याचेवर बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १३२/२५ एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
३) डोंबिवली पोलीस स्टेशन हददीत राजाजी पथ, स्वामी नारायण मंदिराच्या बाजुस असलेल्या मोकळ्या जागेत, रामनगर, डोंबिवली पुर्व येथे इसम नामे १) सचिन एकनाथ कावळे (वय: ३२ वर्षे), राहणार. रूम नं ०२, वसंत केणे चाळ, प्रगती कॉलेज मागे, डी.एन.सी. रोड डोंबिवली पूर्व २) अमन वीरेंद्र गुप्ता उर्फ पप्पु (वय: १६ वर्षे), राहणार. रूम नं ०१, सुगंधी चाळ, दत्तनगर, डोंबिवली पुर्व यांनी मिळून त्यांच्या ताब्यात एकुण २३.५३ ग्रॅम वजनाचा एम.डी. हा अंमली पदार्थ व १० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ एकुण ९३,९४३/- रूपये किंमतीचा अंमली पदार्थ विक्री करीता सोबत बाळगल्याचे मिळून आल्याने त्यांच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ११७/२५ एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८ (क) सह २० (अ), २१ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच परिमंडळ-३ कल्याण मध्ये १ जानेवारी २०२५ ते आजपर्यंत  विशेष अंमली पदार्थ कारवाई पथकामार्फत एकुण १३ गुन्हे दाखल असुन सदर गुन्ह्यात १९ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडुन ६३ ग्रॅम एम.डी. पावडर, २३२ कोडीनयुक्त बॉटल व नशेच्या गोळ्या तसेच ४७ किलो ०४४ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकुण १२ लाखापेक्षा जास्त रुपये किंमतीचा अंमली पदार्थ असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर श्री.आशुतोष डुंबरे साो., मा.पोलीस सह आयुक्त, श्री.ज्ञानेश्वर चव्हाण साो., मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री.संजय जाधव साो., यांचे आदेशाने, श्री.अतुल उत्तमराव झेंडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३ कल्याण, साहाय्यक पोलीस आयुक्त श्री.सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. प्रशांत चव्हाण, पोना. शांताराम कसबे, पोशि. गौतम जाधव, राजेंद्र सोनावणे यांच्या विशेष पथक तसेच डोंबिवली पोलीस ठाणेचे वपोनि. गणेश जावदवाड, सपोनि. कोकरे, मानपाडा पो. स्टे.चे पोनि. गुंड, सपोनि. राळेभात व बाजारपेठ पोलीस ठाणेचे पोनि. दुकले, सपोनि राठोड यांचेकडुन यशस्वीपणे कामगिरी करण्यात आली आहे.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवशी श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात महामृत्युंजय अखंड शिवमंत्र जप आणि हवन संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभण्यासाठी शिवसेना डोंबिवली शहरतर्फे मानपाडा विभागातील तीर्थक्षेत्र श्रु पिंपळेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी अखंड शिव जप अनुष्ठान आणि होम हवन सोहळा संपन्न झाला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ४ फेब्रुवारी रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे आणि डोंबिवली शहर, कल्याण ग्रामीण शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी पिंपळेश्वर मंदिरात होम हवन करण्यात आला.

शिव जप अनुष्ठान, होम हवन सोहळ्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, माजी महापौर विनिता राणे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, शिवसेना डोंबिवली शहर  सचिव संतोष चव्हाण, तालुका सचिव बंडू पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ पाटील, कार्यालय प्रमुख प्रकाश माने, उपशहरप्रमुख गजानन व्यापारी, दिनेश शिवलकर, उपशहर संघटक सुदाम जाधव, उपशहर संघटक संतोष तळाशीलकर, माजी नगरसेवक पंढरी पाटील, विकास देसले, सहकार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे, सतीश मोडक, डोंबिवली पूर्व महिला शहर संघटक स्वाती हिरवे, डोंबिवली पश्चिम महिला शहर संघटक केतकी पोवार आदी मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.