BREAKING NEWS
latest

बुलढाण्यातून निवडणूक लढविण्याचे शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देत खुले आव्हान..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये नेहमीच शाब्दिक खडाजंगी बघायला मिळते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी मेळावा घेतला होता, यावेळी या सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर शिरसंधान केले होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या खोचक वक्तव्याचा शिंदे गटातून समाचार घेण्यात आला असून, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे.

  सविस्तर वृत्तानुसार, बुलढाणा जिल्हयातील चिखली येथील सभेत शिंदे गट आणि भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला उद्देशून हिम्मत असेल तर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान दिले होते. नेमक्या या वक्तव्याने खासदार प्रतापराव जाधव यांच्या वर्मावर घाव केला असून उद्धव ठाकरेंच्या या विधानाला त्यांनी तितक्याच रोखठोक भाषेत उत्तर दिले आहे.

  यावेळी बोलताना खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, मी पुढची पाच वर्षे निवडणूक केवळ शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार आहे. भाजपकडून निवडणूक लढविण्याचा प्रश्नच कुठे उपस्थित होतो. आम्ही शिवसैनिक आहोत आणि केवळ बाळासाहेबांचे विचार पुढे नेत चाललो आहे, असे स्पष्ट मत यावेळी प्रतापराव जाधवांनी मांडले. भाजप आमचा जुना मित्र पक्ष आहे व त्याच पक्षाला पुढे घेऊन आम्ही निवडणूक लढविणार आहे असे देखील मत यावेळी जाधवांनी मांडले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत