BREAKING NEWS
latest

जनतेला महागाईतून दिलासा मिळण्याची शक्यता; पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार !


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  जागतिक स्तरावर अर्थचक्राला कुठे खीळ बसत आहे तर कुठल्या देशांमध्ये संथ गतीने अर्थव्यस्था स्थिर आहे. भारताची अर्थव्यवस्था मात्र याला अपवाद ठरताना दिसत आहे, कारण एकीकडे मंदीमुळे वैश्विक स्तरावर कर्मचारी कपात होत आहे तर दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशात महागाईने जोर धरला आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था कोलमडली असून इथे महागाईचा दर खाली येत नसल्याचे भयावह वास्तव आहे. असे असताना देखील भारतात आता पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याची माहिती आहे, याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही परिस्थिती कारणीभूत ठरत आहे.

  चीनमध्ये मागील अनेक दिवसांपासून जनतेवर जाचक निर्बंध लादत लॉकडाऊन करण्यात आला होता, यामध्ये कित्येक असे लोक आहे ज्यांना अनेक महिन्यांपासून शहराचे दर्शन झाले नाही. आता निर्बंधांमध्ये शिथतीला केल्याने जनतेला दिलासा मिळणार आहे. मात्र या संपूर्ण काळात चीनमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा खूप कमी वापर झाला आहे. दुसरीकडे युक्रेन सोबत युद्धात गुंतलेल्या रशियातील इंधन तेल मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीला आल्याने तेलाची आबादानी झाली आहे. अनेक देशातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढविल्याने याचा फटका आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला बसला आहे, यामुळे प्रति बॅरल कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी घसरण झालेली आहे. येत्या काळात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी घट होणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होण्याची माहिती पुढे आली आहे.

  क्रूड ऑइल शुद्धीकरण करायचे झाल्यास जवळपास २५ ते ३० दिवसांचा अवधी लागतो, त्यामुळे स्वस्त दरात शुद्धीकरण केलेले इंधन तेल उपलब्ध होण्यास महिनाभराचा तरी अवधी लागू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. महत्वाची बाब म्हणजे जवळपास १४ रुपये इतके दर डिझेल आणि पेट्रोलच्या प्रतिलिटरमागे कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत