डोंबिवली पश्चिमेतील 'क्षितिज' संचलित क्षितिज मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी 'श्री गणपती बाप्पा' च्या विविध मूर्तींना आपल्या चिमुकल्या हातांनी आकार दिला. शालेय शिक्षणासोबत अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवल्या जातात. विद्यार्थ्यांना अभ्यासासह आपले छंद जोपासण्यासाठी प्रेरणा दिली जाते तसेच त्यांच्यातील कलाविष्काराला शिक्षकांकडून प्रोत्साहन दिले जाते.
श्री गणेशाची मूर्ती सुंदर, सुबक तसेच आकर्षक कशी करावी हे विद्यार्थांना शिक्षकांनी समजाऊन सांगितले. शाळेच्या पदाधिकारी मुख्याध्यापिका व शिक्षिका या नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी गणेशोत्सव, दीपावली, नाताळ या उत्सवांच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करून अभ्यासाबरोबर विविधांगी कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच सर्वांना प्रेरणा मिळावी व पालक वर्गाला आपल्या पाल्याने घडवलेले कलात्मक आविष्कार पहावयास मिळावे म्हणून शिक्षकांच्या मदतीने शाळेच्या आवारात कल्पकतेने सजवून गणेशमूर्तींचे अनोखे प्रदर्शन भरवले जाते असे शाळेच्या संचालिका अनिता अशोक दळवी यांच्या कन्या अक्षदा दळवी दरेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी झालेल्या बातचीत दरम्यान सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा