BREAKING NEWS
latest

कॅन्सरवर अवघ्या ७ मिनिटांत उपचार करणाऱ्या लशीचा शोध..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
कॅन्सर या जीवघेण्या आजारावरील उपचार जास्त वेळ लागणारे, खर्चिक आणि वेदनादायी असतात. यामुळे रुग्णांचे खूप हाल होतात. मात्र आता या उपचारांचा वेळ तीन-चतुर्थांश कमी करण्यात यश आले आहे. ब्रिटनच्या सार्वजनिक क्षेत्रातील ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ (एनएचएस) इंग्लंडने कॅन्सरवर उपचार शोधला आहे. 'नॅशनल हेल्थ सर्व्हिस'ने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी त्यांनी एक लस शोधली आहे. ही लस देण्यास फक्त सात मिनिटांचा कालावधी लागतो.

वैद्यकीय अहवालानुसार, ऍटेझोलिझुमॅब (Atezolizumab) हे 'ROG.S' कंपनी जेनेटेक द्वारे निर्मिती करण्यात आलेलं इंजेक्शन आहे. हे एक इम्युनोथेरपी औषध आहे जे रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीला कॅन्सरच्या पेशी शोधून नष्ट करण्यास मदत करतं. आरोग्यतज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिलं आहे की, 'एनएचएस'च्या रुग्णांना सध्या फुफ्फुस, स्तन, यकृत आणि मूत्राशयासह रक्तसंक्रमणाद्वारे उपचार दिले जातात. एनएचएस इंग्लंडने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये दरवर्षी ऍटेझोलिझुमॅब इंजेक्शनवर उपचार सुरू करणाऱ्या सुमारे ३६०० रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण वेळ वाचवणाऱ्या या इंजेक्शनची निवड करतील अशी आशा आहे.

'नॅशनल हेल्थ सर्व्हिस'ने आपल्या एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, औषधं आणि आरोग्य सुरक्षा उत्पादन नियंत्रक संस्थेने या लसीला मान्यता दिली आहे. सध्या कॅन्सर रुग्णांना इम्युनोथेरपी अझेझोलिझुमॅब इंजेक्शन दिले जाते, जे देण्यासाठी अर्धा ते एक तास वेळ लागू शकतो. निवेदनानुसार, नवीन कॅन्सरविरोधी लस ऍटेझोलिझुमॅब कमी वेळेत दिली जाऊ शकते आणि रुग्णांना होणार त्रास कमी होईल. यामुळे उपचारातील वेळही वाचेल. भारतात दरवर्षी १ कोटीहून अधिक लोकांना कॅन्सरचा सामना करावा लागतो. सध्या उपलब्ध असलेले उपचार हे परिणामकारक असले तरीही त्यांसाठी खूप वेळ लागतो. या रुग्णांसाठी नवीन लस संजीवनी ठरणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत