BREAKING NEWS
latest

कोट्यावधीची उलाढाल ठप्प होऊन कांद्याचे लिलाव बंदच..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होणारी कांद्याची खरेदी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या चौथ्या दिवशीही लिलाव बंद असल्याने करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प आहेत. कांद्याचे लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीत व्यापारी आणि संचालक मंडळाची घेतली बैठक संपन्न झाली, यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, जो‌ पर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करत नाही. तोपर्यंत आम्ही लिलावात भाग न घेण्यावर ठाम आहोत, त्यामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी बांधवांनी आपले खरेदी परवाने जमा केले आहे.

नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. व्यापाऱ्यांच्या या संपामध्ये नाशिक जिल्ह्यातील ५०० हून अधिक कांदा व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. व्यापाऱ्यांनी हा संप पुकारल्यामुळे तेथील कोणताही व्यापारी आता कांदा लिलावामध्ये सहभागी होत नाही. या संपामुळे कांद्याचा भाव वाढणार असून निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

शेती आणि व्यापाऱ्यांसाठी सरकारने वेगवेगळे नियम आणि कायदे केले आहेत. निर्यात शुल्काबाबतही सरकारने निर्णय घेऊन निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केला आहे. त्यामुळेच कांदा व्यापाऱ्यांनी तो निर्यात शुल्क कमी करावा या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. व्यापाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे नाशिकमधील कांदा बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे आता निर्यातीवर लावण्यात आलेले ४० टक्के शुल्क कमी करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. सरकारने लावलेले निर्यात शुल्क कमी करावे अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे. कांदा लिलावामध्ये व्यापाऱ्यांनी सहभाग न घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत