देशाची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत देशातील काही बँकांवर लाखोंचा दंड ठोठावला आहे. आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयने ४ सहकारी बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. या चार बँका गुजरातच्या वेगवेगळ्या भागात आहेत.
या बँकांवर कारवाई
आरबीआयने 'सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड', (मडोसा) वर ६ लाख रुपये, 'धानेरा मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड' वर ६.५० लाख रुपये, 'जनता को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड' (गोधरा) वर ३.५० लाख रुपये आणि 'मणिनगर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (अहमदाबाद) वर १ लाख रुपये दंड म्हणून आकारले आहेत.
कारण काय आहे ?
'सर्वोदय सहकारी बँक लिमिटेड' आणि 'धानेरा मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड' यांना ५ लाखांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. दोन्ही बँकांवर कारवाईचे कारणही एकच आहे. रिझव्र्ह बँकेने निदर्शनास आणून दिले की या बँका “संचालक, नातेवाईक आणि फर्म यांना कर्ज आणि ऍडव्हान्स” यासंबंधीच्या नियमांचे पालन करू शकली नाही.”, यूएसबी आणि “जामीन/जामीनदार म्हणून संचालक - स्पष्टीकरण” संबंधित सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्या. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे .
'जनता सहकारी बँक' “न्यास आणि संस्थांना देणग्या” आणि “संचालक, नातेवाईक आणि फर्म यांना कर्ज आणि ऍडव्हान्स ” यासंबंधीच्या नियमांचे पालन करू शकली नाही. 'मणिनगर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड'ला यूएसबी आणि “ठेवीवरील व्याज” शी संबंधित नियमांचे कोणतेही उल्लंघन आढळले नाही.
ग्राहकांना याचा फटका बसणार नाही
बँकांनी केलेल्या त्रुटी लक्षात घेऊन ही कारवाई केल्याचे आरबीआयने प्रसिद्धी माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. यामुळे ग्राहक आणि बँकांमध्ये होणाऱ्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा