BREAKING NEWS
latest

'मेडीसीन' चे नोबेल पारितोषिक जाहीर, कोरोना लस निर्मितीत योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचा सन्मान..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
  या वर्षातील वैद्यकीयशास्त्राच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. न्यूक्लिऑकसाईड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या याच शोधामुळे जागतिक महामारी ठरलेल्या 'कोविड-१९' विरुद्ध प्रभावी ठरलेली 'एमआरएनए' लस विकसित करणे शक्य झालं.

त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण निष्कर्षांद्वारे, 'एमआरएनए' ही लस आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी कशा पद्धतीने काम करते याबाबत माहिती मिळवण्यास मदत झाली आहे. जो काळ मानवी जीवनासाठी अत्यंत कठीण ठरला त्या काळामध्ये एक महत्त्वपूर्ण लस विकसित करण्यासाठी कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यांनी अभूतपूर्व योगदान दिले. त्यांच्या या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेण्यात आली. त्यामुळे त्यांना २०२३ चा वैद्यकीयशास्त्रामधील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत