मराठा आरक्षणासाठी ४५ बलिदान दिले आता एकही बलिदान देऊ देणार नाही आणि मराठा आरक्षणासाठीची ही संधी दवडायची नाही असे मनोज जरांगे पाटलांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटलांनी १३ दिवसांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. या दौऱ्यात त्यांनी सर्वात आधी अंबड मधील मराठा बांधवांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
आता यांनी नवीन दणका आणला असून समितीला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काहीच पुरावे सापडत नाही असे म्हणतात मग राज्यातील अनेक समाजाला पुरावे न घेताच आरक्षण कसे दिले असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सापडलेले ५ हजार पुरावे खूप आहेत असा टोला त्यांनी राज्य सरकारला मारला. पुरावे सापडत नाही आणि हे नुसते विमान घेऊन पळतात असा चिमटाही त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना काढला.
आरक्षण मिळेपर्यंत राजकारण आणू नका, शंका कुशंका घेऊ नका ४० व्या दिवशी कुणबी प्रमाणपत्र घेणारच असा निर्धार देखील मनोज जरांगे पाटलांनी अंबडच्या कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा